Thane payroll scam : पॅरोल घोटाळ्याने बहुराष्ट्रीय कंपनी हादरली

५.७८ कोटीचा अपहार
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

ठाणे : वागळे इस्टेट येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत ५ कोटी ७८ लाख ७० हजार ६७५ रुपयांच्या पॅरोल घोटाळ्याचा पर्दाफाश झाला असून, कंपनीचे माजी वरिष्ठ पॅरोल व्यवस्थापक संदीप आंबरे (४०) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंपनीच्या वरिष्ठ संचालक (एचआर) जेनिन एड्रीएन फर्नाडेझ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०२१ ते २०२५ या कालावधीत नोकरी सोडलेल्या कर्मचाऱ्यांच्या फुल अँड फायनल सेटलमेंटच्या नावाखाली आरोपीने स्टँडर्ड चार्टर्ड बँकेतील स्वतःच्या दोन खात्यांमध्ये कंपनीची रक्कम वळती केल्याचे चौकशीत उघड झाले.

Crime News
Chandrapur Fraud News | फायनान्स कंपनीच्या नावाने बनावट कर्ज मंजुरीचे आमिष; १५ लाखांच्या फसवणूक प्रकरणातील आरोपीला पुण्यातून अटक

अंतर्गत तपासात एकूण ७ कोटी ९१ लाख ७० हजार ६७५ रुपयांचा गैरव्यवहार समोर आला. त्यापैकी सुमारे २ कोटी १३ लाख रुपये कंपनीला परत करण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी ५.७८ कोटी रुपये अद्याप परत न केल्याने कंपनीने पोलिसांत तक्रार दाखल केली. आरोपीने बनावट वेतन व्हाउचर तयार करून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप असून, पुढील तपास सुरू आहे.

Crime News
Buldhana Crime | १६ लाखांच्या हरभऱ्यासह फरार ट्रक चालकासह पाच जण जेरबंद; १८.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news