Onion Mumbai Price: मुंबईत कांदा पोहोचला २० रुपयावर; ग्राहकांना दिलासा, शेतकरी हवालदिल

Mumbai Vegetable Market News: सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा
Onion Price
Onion Price Pudhari
Published on
Updated on

Onion Rates In Mumbai

मुंबई: लाल कांद्याचा जुना साठा आणि बाजारात आलेला नवीन कांद्यामुळे मोठ्या प्रमाणात आवक आली आहे.त्याचा परिणाम कांद्याच्या दरावर झाला असून गेल्या काही दिवसापासून मुंबईतील बाजारात प्रतिकिलो कांदा प्रतिकिलो २० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे.

Onion Price
Onion Prices | धोरणात्मक गोंधळ, जागतिक स्पर्धेमुळे कांदा निर्यात संकटात

महागाई काळात कांद्याचे दर उतरल्याने एकप्रकारे;सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.मात्र;दुसरीकडे,दरात घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत तर उत्पादन खर्च निघत नसल्याने तो संकटात सापडला आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन नाशिक जिल्ह्यात होते.त्यामध्ये लासलगाव तर संगमनेर (जि.अहिल्यानगर),ओतूर (जि.पुणे) ,लोणंद (जि.सातारा)

Onion Price
Onion Price Drop | लासलगावसह नाशिक जिल्ह्यात कांदा दरात मोठी घसरण; जानेवारीत शेतकऱ्यांचे 269 कोटींचे नुकसान

या पट्ट्यात कांदा लागवडीचे उत्पादन होते. बाजरात डिसेंबर २०२५ शेवटच्या आठवड्यापासून कांद्याची आवक वाढत होती. यावर्षीच्या सुरुवातीला बाजारात नवीन कांदा आला आहे..मागील वर्षीचा राहिलेला जुना कांदा व आता नवीन कांदा बाजारात आल्याने आवकेत वाढ झाली आहे.याचा परिणाम सरासरी दहा ते पंधरा रुपयाची प्रतिकिलोच्या दरात घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात पुर्वी ३० ते ३५ रुपये प्रतिकिलो कांद्याचा दर होता.तो आता २० रुपयांच्या घरात गेला आहे..या दर घसरणीमुळे उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

Onion Price
Nashik Onion Cultivation 2026 | नाशिक जिल्ह्यात कांदा लागवडीला ब्रेक! गतवर्षीच्या तुलनेत क्षेत्रात 20 हजार हेक्टरने घट

रोजच्या जेवणात कांदा वापरला जातो.त्याशिवाय; ते चविष्ट व स्वादिष्ट होत नाही.सध्या घाऊक बाजारात १४ ते १५ रुपये काद्यांचा प्रतिकिलो दर आहे तर किरकोळ बाजारात तो २० रुपये इतका आहे.चांगला दर्जाचा व नवीन कांदा याला सर्वसामान्य ग्राहका तर हॉटेल चालकांकडून जास्त मागणी आहे.जुना कांदा हा काळवंड झाल्याने त्याला मागणी कमी होत आहे,असे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

भावनगर,खंडवा,इंदौर,भोपाळ या ठिकाणाहून महाराष्ट्रात कांदा येतो.पण; तो कमी प्रमाणात आहे.उत्तर महाराष्ट्रात लासलगाव तर पश्चिम महाराष्ट्रात लोणंद येथे चांगला दर्जाचा कांदा मिळतो.त्यामुळे घाऊक विक्रेते तेथूनच कांदा खरेदी करीत असल्याचे विक्रेत्यांन सांगितले.

Onion Price
Pargaon Onion Farmers Crisis: कांद्याच्या घसरत्या दरांनी शेतकरी अडचणीत; पारगाव परिसरात संकट तीव्र

याबाबत दादर बाजारातील विक्रेते ओमप्रकाश गुप्ता म्हणाले,सध्या बाजारात अडीच किलोचा दर हा ५० रुपये तर चांगला दर्जाचा ५५ ते ६० रुपये इतका आहे.हॉटेलचालकांना रोज ५० किलोपासून ते १०० किलोपर्यंत कांद्यांचे पोते लागते.लाल कांद्याचे दर कमी झाले असले तरी पांढर्या कांद्याचा दर हा स्थिर आहे.तो प्रतिकिलो ३० रुपयांजवळ आहे.ठेवणीच्या काद्यांलाही ग्राहकांची मागणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news