Mumbai Municipal Hospitals PPP Model: महापालिका रुग्णालयांसह आरोग्य सुविधा पीपीपी मॉडेलवर! KPMG ला महिन्याला ३.४५ लाख रुपये

रुग्णालये आणि आरोग्य सुविधा विकसित करण्यासाठी KPMG ची १२ महिन्यांसाठी सल्लागार म्हणून नियुक्ती; एकूण करार ४१.४० लाखांचा
Mumbai Municipal Hospitals PPP Model
Mumbai Municipal Hospitals PPP ModelPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: महापालिकेच्या आरोग्य सेवांमध्ये खासगी भागीदारी वाढवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पालिकेने आपली रुग्णालये आणि आरोग्य सेवा सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर ( पीपीपी) विकसित करण्याची आणि चालवण्याची योजना आखली आहे.

त्यासाठी सेवा पुरवठा देणाऱ्या संस्थांची निवड करण्यासाठी पालिका प्रशासनाने आता केपीएमजी ॲडव्हायझरी सर्विसेस प्रा. लि या कंपनीची एक वर्षासाठी सल्लागार म्हणून निवड केली आहे. या कंपनीला दर महिन्याला ३ लाख ४५ हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.

Mumbai Municipal Hospitals PPP Model
High Court Order: विभक्त पत्नी आणि जुळ्या मुलींसाठी दरमहा ४ लाख पोटगी योग्य; उच्च न्यायालयाचा निर्णय

या कामासाठी वृत्तपत्रांत सार्वजनिक निविदा न काढता राज्य सरकारच्या पॅनेलवरील केपीएमजी कंपनीची थेट निवड करण्यात आल्याने, या प्रस्तावास आता स्थायी समितीची कार्योत्तर मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

‘सल्लागार’च्या रूपात काम पाहणार

केपीएमजी ही संस्था ४९० खाटांचे भगवती रुग्णालय, ४७० खाटांचे श्रीमती म. तु. अगरवाल रुग्णालय (हायब्रिड मॉडेल), १५० खाटांचे ओशिवरा प्रसूती व बालरोग रुग्णालय आणि इतर नऊ तयार सुविधांवर काम करेल.

Mumbai Municipal Hospitals PPP Model
Mahadev Betting Case: महादेव बेटिंग प्रकरणात ७६५.७७ कोटींच्या व्यवहारांचा ईडीकडून तपास

तसेच शताब्दी रुग्णालयात (गोवंडी) १०० जागांचे वैद्यकीय महाविद्यालय (एमबीबीएस) व ५८० खाटांचे रुग्णालय, तर के. बी. भाभा रुग्णालयाजवळ (वांद्रे) १०० क्षमतेचे नर्सिंग महाविद्यालय उभारण्यासाठी ही संस्था तांत्रिक, आर्थिक व निविदा मसुदा सल्लागार म्हणून काम पाहणार आहे.

महापालिकेच्या माध्यमिक आरोग्यसेवा विभागामार्फत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार, ही नियुक्ती २० जुलै २०२६ ते २५ जुलै २०२७ या १२ महिन्यांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. केपीएमजी या नामांकित सल्लागार संस्थेला प्रतिमहा ३,४५,००० रुपये मानधन दिले जाणार असून, १२ महिन्यांच्या या संपूर्ण कंत्राटाचे मूल्य ४१,४०,००० रुपये इतके आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news