Mumbai multiplex for Marathi films: मुंबई पालिका उभारणार मराठी चित्रपटांसाठी मल्टिप्लेक्स सिनेमागृह; स्थायी समितीने केली आर्थिक तरतूद

ही तरतूद सध्या एक कोटी रुपयांची असली तरी सिनेमागृह उभारण्याचा अंतिम निर्णय होईल त्यावेळी या आर्थिक तरतुदीमध्ये वाढ करण्यात येणार आहे.
Mumbai multiplex for Marathi films
Mumbai multiplex for Marathi filmsPudhari
Published on
Updated on

मुंबई: मराठी चित्रपटांना शहरातील मल्टिप्लेक्स सिनेमागृह उपलब्ध होत नसल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने ही चित्रपटगृहे उभारण्यासाठी स्थायी समितीच्या माध्यमातून भाजपा शिवसेना महायुतीने पालिका अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केली आहे. ही तरतूद सध्या एक कोटी रुपयांची असली तरी सिनेमागृह उभारण्याचा अंतिम निर्णय होईल त्यावेळी या आर्थिक तरतुदीमध्ये वाढ करण्यात येणार आहे.

मल्टिप्लेक्स सिनेमागृह मालक मराठी चित्रपटांसाठी आपले सिनेमागृह हवे तेव्हा उपलब्ध करून देत नाही. हिंदी चित्रपटांना प्राधान्य देत, एखादा मराठी चित्रपट मल्टिप्लेक्स सिनेमागृहात लावला जातो. विशेष म्हणजे मराठी चित्रपटांना प्रेक्षक असतानाही हे चित्रपट लावले जात नसल्यामुळे महापालिकेने पुढाकार घेऊन मल्टिप्लेक्स सिनेमागृह उभारण्याची मागणी भाजपाने केली होती.

Mumbai multiplex for Marathi films
Ministers Office Allocation: मंत्रालयातील नवीन इमारतीत 2 मंत्री, 5 राज्यमंत्र्यांना दालने

परंतु महापालिकेने याकडे दुर्लक्ष करत, चित्रपट गृह उभारण्यासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूदच केली नाही. त्यामुळे स्थायी समितीला असलेल्या अधिकाराखाली पालिकेतील सत्ताधारी भाजपा शिवसेना महायुतीने मराठी चित्रपटांसाठी मल्टिप्लेक्स चित्रपटगृह उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे.

स्थायी समितीने केलेल्या आर्थिक तरतुदीचा विचार करून नेमकी कुठे मल्टिप्लेक्स चित्रपटगृहे उभारावीत याचा अभ्यास करण्यात येणार आहे. मराठी लोकवस्ती असलेल्या लालबाग, परळ, दादर, शिवाजी पार्क, वरळी, गिरगाव, माझगाव, शिवडी, चेंबूर, गोरेगाव, जोगेश्वरी, दहिसर आदी ठिकाणी ही मल्टिप्लेक्स चित्रपटगृहे उभारली जातील.

Mumbai multiplex for Marathi films
Underground Parking Project: पालिकेच्या प्रत्येक विभागात भूमिगत पार्किंग

त्यामुळे या भागात चित्रपटगृहे उभारण्यासाठी नेमकी कुठे जागा आहे याचा शोध घेतला जाणार आहे. ही चित्रपटगृहे उभारण्यासाठी येणाऱ्या आर्थिक वर्षात महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news