Mumbai Metro Expansion : मानपाडा-काटई नाका ते तळोजा मेट्रो मार्गिकेला मंजुरी

१८.४० किमी मार्गावर एकात्मिक उड्डाणपुलासह १२ उन्नत स्थानकांचा समावेश
Mumbai Metro Expansion
Mumbai Metro Expansionpudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : मानपाडा-काटई नाका ते तळोजा (कल्याण फाटा मार्गे) या भागाला जोडणाऱ्या १८.४० किलोमीटर लांबीच्या मुंबई मेट्रो लाईन १२ अ ला मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने मंजुरी दिली. पुढील साडेतीन वर्षात या मार्गिकेचे काम पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत नव्या मार्गिकेच्या कामाला मंजुरी देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मेट्रो मार्गिका १२ अ मुळे औद्योगिक आणि लॉजिस्टिक केंद्रांशी संपर्क वाढण्याबरोबरच कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई शहरांमधील वाहतूक जोडणी अधिक सक्षम होणार आहे. त्यामुळे ही मार्गिका साडेतीन वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश फडणवीस यांनी यावेळी दिले.

Mumbai Metro Expansion
Devendra Fadnavis : कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना दमदाटी केल्यास गुन्हा

राज्यातील जी मेट्रोची कामे सुरू आहेत, त्या कामांचा वेग वाढवून ती वेळेत पूर्ण होतील, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही दिल्या. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे. मेट्रो मार्गिका आणि एकात्मिक उड्डाणपुलाच्या अंमलबजावणीसाठी एमएमआरडीएला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. प्रकल्पाच्या प्रभाव क्षेत्रातील निश्चित शासकीय जमिनी प्रकल्प विकास व निधी उभारणीसाठी प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यासही यावेळी मंजुरी देण्यात आली.

असा आहे प्रकल्प

ही संपूर्ण मेट्रो मार्गिका उन्नत असून त्यावर १२ स्थानके प्रस्तावित आहेत. प्रकल्पात ६.९३ किलोमीटर लांबीचा चारपदरी आणि ८.६९ किलोमीटर लांबीचा सहापदरी एकात्मिक उड्डाणपूल समाविष्ट आहे. या मार्गिकेवर दररोज ४ लाख ७४ हजार प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज आहे. काटई नाका येथे मेट्रो मार्गिका १२ व बुलेट ट्रेन जोडमार्ग, काटई नाका ते कल्याण फाटा दरम्यान मेट्रो मार्गिका १४ आणि अमनदूत येथे नवी मुंबई मेट्रो मार्गिका १ शी जोडणी प्रस्तावित आहे. सर्व स्थानकांवर फीडर बससेवाही प्रस्तावित आहे.

Mumbai Metro Expansion
High Court: गैर-हिंदूंना अगामिक मंदिरांत प्रवेशासाठी श्रद्धेचे हमीपत्र द्यावे लागणार : उच्च न्यायालय

प्रवासाचा वेळ ४० टक्क्यांनी घटणार

या प्रकल्पामुळे रस्ते प्रवासाच्या तुलनेत प्रवासासाठी लागणारा वेळ ४० ते ५० टक्क्यांनी कमी होणे अपेक्षित आहे. शिवाय सुविधा वाढल्याने खासगी वाहनांचा वापर कमी होण्यास मदत होईल. प्रवासाचा वेळ कमी करणे, रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी, पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीला चालना देणे आणि प्रादेशिक आर्थिक विकासासाठी सक्षम वाहतूक व्यवस्था निर्माण करणे ही उद्दिष्टे या प्रकल्पामुळे साध्य होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news