Devendra Fadnavis : कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना दमदाटी केल्यास गुन्हा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्पष्ट इशारा
Devendra Fadnavis
Devendra FadnavisPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई : कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना दमदाटी करणाऱ्या वित्तीय संस्थांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. कर्जवसुलीसाठी दमदाटी प्रकरणात तातडीने शेतकऱ्यांची तक्रार नोंदवून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश सर्व जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले.

मायक्रोफायनान्स कंपन्यांनी सक्तीने किंवा दमदाटी करून वसुली करू नये, यासाठी रिझर्व्ह बँकेला पत्र पाठविण्यात येणार आहे. अशा प्रकारे बळाचा वापर करणाऱ्या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

Devendra Fadnavis
Pune FDA Action: दिवाळीच्या फराळावर FDA ची धडक! पुण्यात ८७.६ किलो अनारसे जप्त

नांदेडची घटना अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर आहे. याची दखल मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आली असून कोणत्याही बँकांनी अथवा कंपन्यांनी शेतकऱ्यांकडे अशाप्रकारे तगादा लावणे खपवून घेतले जाणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात योग्य नियोजन करावे

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सर्व मंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांत पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे निर्देशही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आले. जलसंधारणाच्या कामांनाही प्राधान्य देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या. छोटे बंधारे बांधणे, तलावांचे रुंदीकरण करणे आणि गाळ उपसणे यांसारख्या कामांवर भर देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. रायगड जिल्ह्याच्या धर्तीवर लोकसहभागातून छोटे बंधारे उभारून पाणी अडविणे आणि जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना करण्यात आली.

Devendra Fadnavis
High Court: गैर-हिंदूंना अगामिक मंदिरांत प्रवेशासाठी श्रद्धेचे हमीपत्र द्यावे लागणार : उच्च न्यायालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news