Mumbai Metro Inauguration: मुंबईत मेट्रो विस्ताराला वेग; 3 एप्रिलला मेट्रो-9 आणि मेट्रो-2B टप्प्यांचे लोकार्पण

दहिसर-काशिगाव आणि डायमंड गार्डन-मंडाले टप्पा सुरू, वांद्रे-कुर्ला पॉड टॅक्सी प्रकल्पाचेही भूमिपूजन
Metro Navi Mumbai
MetroNavi MumbaiPudhari
Published on
Updated on

मुंबई : दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो-9 मार्गिकेचा दहिसर-काशिगाव टप्पा 1 आणि मेट्रो-2 ब मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा 1 यांचे लोकार्पण 3 एप्रिलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यासोबतच पॉड टॅक्सीचे भूमिपूजनही केले जाणार आहे.

Metro Navi Mumbai
NCP Merger: विलीनीकरण व्हावे, पण सुनेत्रावहिनींच्या नेतृत्वात; राष्ट्रवादीच्या आमदारांची भूमिका

दहिसर ते गुंदवली मेट्रा- 7 मार्गिकेचा उत्तर टोकाकडील विस्तार म्हणजे मेट्रो-9 मार्गिका. या मार्गिकेच्या दहिसर ते काशिगाव या पहिल्या टप्प्याचे काम गेल्या वर्षअखेरीस पूर्ण झाले होते. जानेवारीत सीएमआरएस प्रमाणपत्रही मिळाले. तसेच अंधेरी पश्चिम ते मंडाळे मेट्रो-2 ब मार्गिकेच्या मंडाळे ते डायमंड गार्डन या पहिल्या टप्प्याला सीएमआरएस प्रमाणपत्र मिळूनही लोकार्पण रखडले आहे.

Metro Navi Mumbai
BMC Commissioner: मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी शर्यत रंगली; म्हैसकर आणि मुखर्जी आघाडीवर

मेट्रो-9 सुरू झाल्यास गुंदवलीपासून थेट काशिगावपर्यंत मेट्रोने प्रवास करता येईल. तसेच मेट्रो-2 ब सुरू झाल्यास पूर्व उपनगराला पहिली मेट्रो मिळणार आहे. मेट्रो-2 ब मार्गिकेचा पहिला टप्पा 5.53 किमी लांबीचा आहे, तर मेट्रो-9 मार्गिकेचा पहिला टप्पा 4.4 किमीचा आहे.

Metro Navi Mumbai
Maharashtra GR: मार्च-एंडची लगबग! सुट्टीच्या दिवशीच 103 शासन निर्णय जारी

पॉड टॅक्सीचे भूमिपूजन

वांद्रे रेल्वे स्थानकापासून ते कुर्ला रेल्वे स्थानकापर्यंत पॉड टॅक्सी प्रकल्प उभारला जाणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलात रोज ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या प्रवासाची सोय यामुळे होईल, असे सांगितले जाते. या प्रकल्पाची उभारणी आणि संचालन करण्यासाठी वर्षभरापूर्वीच संस्थेची नियुक्ती केली आहे. मेट्रो प्रकल्पांच्या लोकार्पणासोबतच पॉडटॅक्सी प्रकल्पाचे भूमिपूजन केले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news