Marathi Signboard Rule: मराठी फलक न लावणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; दररोज 2 हजारांचा दंड

५०७६ दुकानदारांनी मराठी फलक न लावल्यामुळे त्यांच्यावर कारवाई सुरू आहे.
Marathi Signboard Rule
Marathi Signboard RulePudhari
Published on
Updated on

मुंबई: दुकानावरील फलक मराठी भाषेत करणे बंधनकारक असताना मुंबईत काही दुकानदार व व्यावसायिक जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत. या दुकानदारांकडून एक लाख रुपये दंड वसूल केला जाणार असून जोपर्यंत फलक लावत नाही तोपर्यंत दुकानातील प्रतिकर्मचारी प्रत्येक दिवशी २ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

दुकानांवरील इंग्रजी व अमराठी फलकांवरून शिवसेना आक्रमक झाली असून, स्थायी समिती शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे प्रशासनाला याबद्दल जाब विचारला होता. १४ ते २५ मे दरम्यान विशेष मोहिमेत मुंबई शहर व उपनगरांत ८७३ दुकाने व व्यावसायिकांनी मराठी फलक लावले नसल्याचे दिसून आले.

Marathi Signboard Rule
Health Department Transfers: कामगिरीच्या आधारेच बदल्या, बढत्या; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

या दुकानदार, हॉटेल व व्यावसायिकांना मुंबई महापालिकेने नोटीस बजावत एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारला. शिवाय पालिकेने नोटीस बजावल्यापासून मराठी फलक लावेपर्यंत प्रति दिवस प्रति कर्मचारी दोन हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार असल्याचे दुकाने व आस्थापना खात्यामार्फत स्पष्ट करण्यात आले. एका दुकानात पाच जण काम करत असतील तर दररोज दहा हजार रुपये त्या दुकानाला दंड बसू शकतो.

Marathi Signboard Rule
11th Admission Second Round: अकरावीची दुसरी नियमित फेरी आजपासून

फलकावर प्रथम देवनागरी लिपी मराठी भाषेत नाव आवश्यक आहे. फलकावर अन्य भाषेपेक्षा मराठी अक्षरे मोठी व ठळक अक्षरांत असणे आवश्यक आहे. मुंबई शहर व उपनगरांत परवाना असलेले ७ लाख ४४ हजार ५६७ दुकाने, हॉटेल व अन्य व्यावसायिक गाळे आहेत. यापैकी दहा व दहापेक्षा अधिक कामगार असलेल्या आस्थापनांची संख्या १ लाख १५ हजार ९९२ इतकी आहे. नऊ कामगार असलेल्या आस्थापनांची संख्या ६ लाख २८हजार ५७५ इतकी आहे. यातील ५०७६ दुकानदारांनी मराठी फलक न लावल्यामुळे त्यांच्यावर कारवाई सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news