Viral Video: ही काय भानगड? दुःख ऐकण्यासाठी २५०, तर सोबत रडण्यासाठी १,००० रुपये; मुंबईतील तरुणाची 'बिझनेस आयडिया' व्हायरल!

Viral Video: ही काय भानगड? दुःख ऐकण्यासाठी २५०, तर सोबत रडण्यासाठी १,००० रुपये; मुंबईतील तरुणाची 'बिझनेस आयडिया' व्हायरल!

Viral Video Mumbai Beach: आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला कोणाशी तरी मनमोकळेपणाने बोलायचे असते, पण ऐकून घेणारं कोणी नसतं. याच एकाकीपणावर मुंबईतील एका तरुणाने एक अनोखी शक्कल लढवली आहे.
Published on

Mumbai Viral News

मुंबई: आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला कोणाशी तरी मनमोकळेपणाने बोलायचे असते, पण ऐकून घेणारं कोणी नसतं. सोशल मीडियावरच्या अभासी जगापेक्षा प्रत्यक्षात समोर बसून कोणाकडे तरी दु:ख व्यक्त करावे असे अनेकांना वाटत असते. याच एकाकीपणावर मुंबईतील एका तरुणाने एक अनोखी शक्कल लढवली आहे. मुंबईच्या गजबजलेल्या समुद्रकिनाऱ्यावर बसून लोकांचे दुःख ऐकून घेण्याचा त्याने व्यवसाय सुरू केला असून, सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Viral Video: ही काय भानगड? दुःख ऐकण्यासाठी २५०, तर सोबत रडण्यासाठी १,००० रुपये; मुंबईतील तरुणाची 'बिझनेस आयडिया' व्हायरल!
Human Longevity: माणूस २०० वर्षे जगणार? बोहेड व्हेल माशाच्या शरीरात सापडले मानवी दीर्घायुष्याचे 'अमृत'

नेमका प्रकार काय?

मुंबईतील एका गजबजलेल्या समुद्रकिनाऱ्यावर या तरुणाने एक लहान टेबल आणि खुर्ची मांडली असून समोर एक रंगीत पाटी लावली आहे. या पाटीवर त्याने वेगवेगळ्या सेवांचे दर लिहिले आहेत, छोट्या समस्या ऐकण्यासाठी २५० रुपये, मोठ्या समस्यांसाठी ५०० रुपये आणि जर तुम्हाला फक्त कोणीतरी तुमच्यासोबत बसून रडावे असे वाटत असेल तर १००० रुपये.

'न्यूज अल्जेब्रा' नावाच्या हँडलवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये हा तरुण अत्यंत शांतपणे लोकांची वाट पाहत बसलेला दिसतो. जेव्हा त्याला विचारण्यात आले की, लोक खरच पैसे देऊन तुमच्याकडे बोलायला येतात का? त्यावर त्याने हसत "हो" असे उत्तर दिले. तो म्हणतो की, लोकांच तो ऐकून घेतो, शक्य असल्यास सल्ला देतो आणि लोक सहसा थोडे हलके होऊन निघून जातात.

त्याच्यासाठी हे फक्त पैशांसाठी नाही

त्याने सांगितले की, त्याने मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला आहे. तो याकडे केवळ एक व्यावसायिक युक्ती म्हणून पाहत नाही, तर त्याचा या गोष्टीवर विश्वास आहे. त्याची संकल्पना अगदी सोपी आहे, शांत बसा, समोरच्याचे नीट ऐकून घ्या, मध्येच अडथळा आणू नका आणि लोकांना जे बोलायचे आहे ते बोलू द्या.

सोशल मीडियावर लोकं काय म्हणातात?

व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, 'या माणसाने बीचवर सर्वात मोठा बिझनेस सुरू केला आहे. ही एक नवीन कल्पना असल्याचे त्याने म्हटले.' दुसऱ्या एका कमेंटमध्ये म्हटले आहे, "हा तरुण थेरपिस्ट जे काम करतात तेच करत आहे, पण पदवी, वेटिंग लिस्ट आणि तासाला हजारो रुपयांच्या शुल्काशिवाय!"

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news