Human Longevity: माणूस २०० वर्षे जगणार? बोहेड व्हेल माशाच्या शरीरात सापडले मानवी दीर्घायुष्याचे 'अमृत'

युनिव्हर्सिटी ऑफ रॉचेस्टरमध्ये झालेल्या एका संशोधनातून असे समोर आले आहे की, बोहेड व्हेल मध्ये एक विशेष प्रथिन आढळले आहे, जे मानवी डीएनए अधिक चांगल्या प्रकारे दुरुस्त करण्यास मदत करू शकते.
Human Longevity
Human Longevityfile photo
Published on
Updated on

Human Longevity

नवी दिल्ली: दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्याची इच्छा कोणाला नसते? प्रत्येक माणसाची हीच इच्छा असते की त्याने जास्तीत जास्त वर्षे आनंदी आणि सुदृढ जीवन जगावे. मात्र, आजच्या काळात हे स्वप्न हळूहळू कठीण होत चालले आहे. वाढते प्रदूषण, खाण्यापिण्याच्या बिघडलेल्या सवयी आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे आजारांचा धोका सतत वाढतोय. या सर्व कारणांचा परिणाम मानवी आयुर्मानावर आणि आरोग्यावर होत असून, बहुतेक लोक जास्तीत जास्त ७०-८० वर्षांपर्यंतच जगू शकत आहेत.

अशा काळात वैज्ञानिकांचा एक नवीन शोध आशेचा किरण घेऊन समोर आला आहे. बोहेड व्हेल मध्ये एक विशेष प्रथिन आढळले आहे, जे मानवी डीएनए अधिक चांगल्या प्रकारे दुरुस्त करण्यास मदत करू शकते. हा शोध केवळ आयुष्य वाढवण्याच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल मानले जात नाही, तर 'भविष्यात माणूस २०० वर्षांपर्यंत जगू शकतो का?' असा प्रश्नही उपस्थित करत आहे.

Human Longevity
Obesity Health Alert | सावधान! लठ्ठपणा केवळ 'लाईफस्टाईल' नाही, तर एक 'जुनाट आजार'! डायबेटीजतज्ज्ञ कोणते धोके सांगतात?

दीर्घायुष्याचे अनोखे रहस्य

जगात प्राण्यांच्या अशा अनेक प्रजाती आहेत ज्या दीर्घकाळ जिवंत राहतात. यामध्ये बोहेड व्हेलचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. हे व्हेल पृथ्वीवरील सर्वाधिक काळ जगणाऱ्या प्राण्यांपैकी एक असून, त्यांचे वय २०० वर्षांहून अधिक असल्याचे आढळले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, इतके प्रदीर्घ आयुष्य जगूनही त्यांच्यात कॅन्सर किंवा इतर कोणत्याही गंभीर आजाराची लक्षणे दिसत नाहीत. याचा अर्थ असा की ते अशा आजारांपासून सुरक्षित राहतात.

युनिव्हर्सिटी ऑफ रॉचेस्टरमध्ये झालेल्या एका संशोधनातून असे समोर आले आहे की, याचे मुख्य कारण त्यांच्या शरीरात आढळणारे CIRBP (Cold-inducible RNA-binding protein) हे प्रथिन असू शकते. हे विशेष प्रथिन बोहेड व्हेलमध्ये मानवाच्या तुलनेत सुमारे १०० पटीने जास्त असते. हे प्रथिन डीएनएमध्ये होणारे 'डबल-स्ट्रँड ब्रेक्स' दुरुस्त करण्यात अत्यंत उपयुक्त ठरते. याच डॅमेजचा संबंध वाढते वय, कॅन्सर आणि इतर अनेक आजारांशी असतो.

मानव आणि माश्यांवर झालेली चाचणी

रॉचेस्टर युनिव्हर्सिटीच्या संशोधन पथकाने बोहेड व्हेलच्या या CIRBP प्रथिनाची चाचणी मानवी पेशी आणि माश्यांवर केली. याचे निकाल अत्यंत थक्क करणारे होते. असे दिसून आले की, मानवी पेशींमध्ये डीएनए दुरुस्त करण्याची क्षमता जवळपास दुपटीने वाढली. इतकेच नाही तर, मानवी पेशींमधील 'रिपेअरिंग' प्रक्रिया आता पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे होत होती.

दुसरीकडे, माश्यांवर केलेल्या चाचणीत त्यांचे आयुष्य वाढलेले दिसले आणि त्या रेडिएशनच्या प्रभावापासून अधिक सुरक्षित आढळल्या. या सकारात्मक निकालानंतर आता वैज्ञानिकांनी या प्रथिनाची चाचणी उंदरांवरही सुरू केली आहे, ज्यातून भविष्यात आणखी मोठे निष्कर्ष समोर येऊ शकतात.

व्हेलच्या दीर्घायुष्याचे गुपित काय?

'पेटो पॅराडॉक्स' नुसार, मोठे आणि दीर्घकाळ जगणाऱ्या प्राण्यांमध्ये कॅन्सरचे प्रमाण कमी का असते, हा प्रश्न शास्त्रज्ञांना अनेक दिवसांपासून सतावत होता. रॉचेस्टर युनिव्हर्सिटीच्या टीमला असे आढळले की, बोहेड व्हेल खराब झालेल्या पेशींना मारण्याऐवजी, डीएनए दुरुस्त करून स्वतःला अशा आजारांपासून सुरक्षित ठेवतात.

मात्र, शास्त्रज्ञांचे असेही म्हणणे आहे की, याबाबत आताच जास्त हुरळून जाण्याची गरज नाही. कारण व्हेलचे दीर्घायुष्य हे केवळ एका प्रथिनामुळे नसून, अनेक जैविक प्रक्रियांचा एकत्रित परिणाम असू शकतो.

या संशोधनामुळे एक आशा निर्माण झाली आहे की, डीएनए सुधारणाऱ्या प्रथिनांवर काम करून मानवी आयुष्य वाढवता येऊ शकते. पण सध्या तरी हा परिणाम केवळ प्रयोगशाळेतच दिसून आला आहे, त्यामुळे भविष्याबाबत ठोसपणे सांगण्यासाठी अजून प्रतीक्षा करावी लागेल.

Human Longevity
Tobacco–Diabetes Link | व्यसन वडिलांचे, शिक्षा मुलांना..! जाणून घ्या तंबाखू आणि मुलांमधील मधुमेहाचा काय आहे संबंध?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news