Mumbai Crime: द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या प्रशिक्षकाचा नराधम चेहरा; पोक्सोचा गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीशी लगट करून विनयभंग
Mumbai Crime
Mumbai CrimePudhari
Published on
Updated on

मुंबई: द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त गणेश देवरुखकर या मल्लखांब प्रशिक्षकावर अल्पवयीन मुलीशी अश्‍लील लगट करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

याच गुन्ह्यांत चौकशी करुन देवरुखकरला नोटीस देऊन सोडून देण्यात आले. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रिया थोरात यांनी दुजोरा दिला आहे. सोळा वर्षीय पीडित मुलगी विलेपार्ले येथे तिच्या कुटुंबियांसोबत राहत असून सध्या शिक्षण घेत आहे. विलेपार्ले येथील पार्लेश्‍वर व्यायामशाळेत ती नियमित जिम्नॅस्टिकसाठी जात होती. तिथेच गणेश देवरुखकर प्रशिक्षक म्हणून काम करत होता.

Mumbai Crime
Mira Road Crime: झोपेत असलेल्या आपल्या अल्पवयीन मुलींचे आक्षेपार्ह फोटो काढून पाठवले प्रियकराला; आईसह प्रियकराला अटक

२१ ऑगस्टला रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास गणेश देवरुखकर यांनी या मुलीला मेसेज करून जिममध्ये बोलाविले होते. ती जिममध्ये गेल्यानंतर देवरूखकर याने जिमला आतून कडी लावून तिच्याशी जवळीक साधून तिच्याशी अश्‍लील लगट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि घरी जाण्यासाठी निघाली. यावेळी त्याने तिला घडलेला कोणालाही सांगू नकोस असे सांगितले.

घरी आल्यानंतर तिने तिच्या पालकांना हा प्रकार सांगितला. ही माहिती ऐकून त्यांना धक्का बसला. त्यानंतर त्यांनी गणेश देवरुखकरविरुद्ध विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी दखल घेत त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल केला.

Mumbai Crime
Navi Mumbai Air Pollution: अव्हेन्यू सुपरमार्टची बांधकाम साईट सील; वायू प्रदूषण केल्याप्रकरणी नवी मुंबई महापालिकेची आक्रमक कारवाई

त्यानंतर त्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले. या गुन्ह्यांत सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असल्याने त्याला चौकशीनंतर नोटीस देऊन सोडून देण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रिया थोरात यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news