Mira Road Crime: झोपेत असलेल्या आपल्या अल्पवयीन मुलींचे आक्षेपार्ह फोटो काढून पाठवले प्रियकराला; आईसह प्रियकराला अटक

आईसह प्रियकराविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
Jail
JailPudhari
Published on
Updated on

मिरा रोड: स्वतःच्या दोन निष्पाप अल्पवयीन मुलींचे झोपेत असताना आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ काढून ते प्रियकराला पाठवल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार मिरा रोड येथील नयानगर परिसरात उघडकीस आला आहे.

या प्रकरणी नयानगर पोलिसांनी कारवाई करत ४२ वर्षीय आई आणि तिच्या ४६ वर्षीय प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघांनाही अटक केली आहे.

Jail
Mahad Raksha Bandhan Bharat Gogawale| लाडक्या बहिणींच्या पाठींब्यामुळेच चार वेळा आमदार: भरत गोगावले

पतीपासून विभक्त झालेली ही महिला तिच्या २२ वर्षीय मुलासह तसेच १३ आणि १० वर्षांच्या दोन मुलींसोबत मिरा रोड येथे राहते. तक्रारीनुसार, मार्च महिन्यात जेव्हा दोन्ही अल्पवयीन मुली घरात झोपल्या होत्या, तेव्हा आईने त्यांचे आक्षेपार्ह चित्रीकरण करून व्हॉट्सॲपद्वारे तिच्या प्रियकराला पाठवले.

आरोपींनी एकमेकांचे तसेच अन्य व्यक्तींचे आक्षेपार्ह व्हिडिओही मोबाईलवर शेअर केल्याचे समोर आले आहे. हा धक्कादायक प्रकार पीडित मुलींच्या २२ वर्षीय भावाच्या लक्षात आला. त्याने आईच्या मोबाईलमध्ये हे फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर आई व तिच्या प्रियकराला जाब विचारला.

त्यावर आरोपी प्रियकराने तरुणाला मारहाण करत पोलिसांत गेल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. धमकीला न घाबरता या तरुणाने थेट नयानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Jail
Murud Paddy Farming: मुरुड तालुक्यात भात लावणीची कामे पूर्ण

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी आई आणि तिच्या साथीदाराविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

हे दोघे अशा एखाद्या मोठ्या रॅकेट किंवा सायबर नेटवर्कचा भाग आहेत का, याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संविधान चौरे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news