Mumbai Local Train Delay: लोकलच्या खोळंब्याचा परीक्षांना फटका; अनेकांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यास उशीर

काही महाविद्यालयांनी पेपर पुढे ढकलला
Mumbai Local Train Delay
Mumbai Local Train DelayPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: मध्य रेल्वेवरील लोकल सेवा विस्कळीत झाल्याचा फटका सोमवारी महाविद्यालयीन परीक्षांना बसला. गाड्या उशिराने धावत असल्याने आणि स्थानकांवर गर्दी झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचता आले नाही. यामुळे काही महाविद्यालयांनी परीक्षा पुढे ढकलली, तर काही ठिकाणी उशिरा पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देण्यात आला.

मुंबईतील अनेक महाविद्यालयांमध्ये सध्या सत्र परीक्षा सुरू आहेत. सकाळी १०.३० ते ११ वाजता परीक्षा असलेल्या विद्यार्थ्यांना लोकलच्या विलंबाचा अधिक फटका बसला. वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.

Mumbai Local Train Delay
Medicine sample Testing: सरकारी रुग्णालयांतील औषधांवर आता AI ची नजर! अवघ्या २ मिनिटांत प्राथमिक तपासणी

विद्याविहार येथील के. जे. सोमय्या वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने सोमवारी होणारा पेपर पुढे ढकलला आहे. महाविद्यालयाने परिपत्रकाद्वारे ही परीक्षा २८ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

रुपारेल महाविद्यालयातील बीएमएस अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी सुमारे १० विद्यार्थी वेळेत पोहोचू शकले नाहीत. सकाळी १०.३० वाजता सुरू होणाऱ्या परीक्षेला हे विद्यार्थी ११.१५ वाजता पोहोचले.

Mumbai Local Train Delay
Tiger Shroff Firing Case: टायगरपूर्वी आमिर खान होता लक्ष्य? सुरक्षा भेदता न आल्याने कट बदलल्याचा संशय

त्यांच्याकडून उशिरा येण्याचे कारण स्पष्ट करणारे पत्र घेण्यात आले आहे. हा विषय परीक्षा समितीसमोर ठेवण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना दिलासा देण्याबाबत समिती निर्णय घेईल, असे महाविद्यालयातील एका वरिष्ठ प्राध्यापकाने सांगितले.

प्रवासासाठी पर्यायी साधनांचा आधार

लोकल सेवा विस्कळीत झाल्याने विद्यार्थ्यांना प्रवासासाठी पर्यायी साधनांचा आधार घ्यावा लागला. रिक्षा आणि टॅक्सीने प्रवास केल्याने अतिरिक्त खर्चही सहन करावा लागला. अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचता आले नाही. यामुळे काही महाविद्यालयांनी परीक्षा पुढे ढकलली, तर काही ठिकाणी उशिरा पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news