Mumbai Local Megablock : रविवारी मध्य आणि हार्वर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

काही लोकल रद्द किंवा स्थगित करण्यात येणार
Mumbai Local Megablock
Mumbai Local Megablockpudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मध्य रेल्वेकडून रविवार, २७ सप्टेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा-मुलुंड तर हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी दरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक असेल. त्यामुळे काही लोकल रद्द किंवा स्थगित करण्यात येणार आहेत.

माटुंगा ते मुलुंड स्थानकांच्यादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी १५.४५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. सकाळी १०.३६ ते दुपारी १५.१० या वेळेत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील.

Mumbai Local Megablock
Mumbai Ganesh Visarjan 2026 : लाडक्या बाप्पाला आज निरोप!

ठाणे स्थानकाच्या पुढे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. सकाळी ११.०३ ते दुपारी १५.३८ या वेळेत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या मुलुंड व माटुंगा स्थानकांच्यादरम्यान निर्धारित स्थानकांवर थांबतील.

हार्वरवर विशेष गाड्या

कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी १६.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी १०.३४ ते दुपारी १५.३६ या वेळेत सीएसएमटी येथून वाशी-बेलापूर-पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा व सकाळी १०.१७ ते दुपारी १५.४७ या वेळेत पनवेल-बेलापूर-वाशी येथून सीएसएमटी येथे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

Mumbai Local Megablock
DSE Engineering Admission 2026 : थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकीला ५० हजार १५३ विद्यार्थ्यांचे प्रवेश

ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-कुर्ला-सीएसएमटी व पनवेल-वाशी-पनवेल दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. ट्रान्स-हार्बर आणि उरण पोर्ट मार्गावरील सेवा रविवारच्या वेळापत्रकानुसार चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत हार्बर लाइनवरील प्रवाशांना ठाणे-वाशी-नेरुळ स्थानकांदवारे प्रवास करण्याची मुभा असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news