Mumbai local AC train : २३८ एसी लोकलची निर्मिती रेल्वे स्वतः करणार

चेन्नई, कपूरथला आणि रायबरेली येथे होणार निर्मिती
Mumbai local AC train
Mumbai local AC trainpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : मुंबई लोकलची प्रवासी क्षमता वाढविण्यासाठी पायाभूत सुविधांची कामे सुरू असतानाच एसी लोकल रेक वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनने (एमआरव्हीसी) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. २३८ एसी रेकच्या बांधणीसाठी खासगी कंत्राटदारासाठी काढलेली निविदा रद्द करून आता भारतीय रेल्वेच्या तीन उत्पादन कारखान्यांत या रेकची समांतर निर्मिती केली जाणार असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनचे (एमआरव्हीसी) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास वाडेकर यांनी येथे दिली. चेन्नई, कपूरथला आणि रायबरेली येथील कारखान्यात या लोकलची निर्माती केली जाणार आहे. एकाच वेळीच्या कामामुळे पहिली लोकल २०२७ मध्येच उपलब्ध होईल, असा दावा एमआरव्हीसीने केला आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वेचे जाळे अधिक सक्षम व्हावे म्हणून नवीन कॉरिडॉर, अतिरिक्त रेल्वे मार्गिका, १५ डब्यांच्या गाड्यांसाठी फलाटांचा विस्तार तसेच यार्ड पुनर्रचनेसारख्या कामांसाठी सुमारे २२ हजार कोटींची गुंतवणूक केली जात आहे. त्यानुसार सरकारने मुंबईसाठी २३८ अतिरिक्त एसी लोकल गाड्या घेण्यास मंजुरीही दिली होती.

Mumbai local AC train
Amenity Space: अ‍ॅमिनिटी स्पेसच्या नियमात बदल

एका खासगी तंत्रज्ञान भागीदाराच्या माध्यमातून ही खरेदी प्रक्रिया सुरू होती. मात्र, त्याच्याकडून पहिली लोकल २०३० पर्यंत उपलब्ध होणार होती. तसेच संपूर्ण गाड्या मिळेपर्यंत २०३४ उजाडणार होते. त्याचा मोठा परिणाम मुंबईतील रेल्वेच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर होऊन प्रकल्प रखडण्याची शक्यता होती. याचा विचार करून आता या सर्व लोकल रेल्वे स्वतः निर्माण करणार आहे.

रेल्वेच्या या ३ कारखान्यांत होणार निर्मिती

मुंबईच्या २३८ एसी लोकलची निर्मिती रेल्वे स्वतःच्या तीन उत्पादन कारखान्यांतून एकाच वेळी करणार आहे. यामध्ये चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ), कपूरथला येथील रेल कोच फॅक्टरी ( आरसीएफ ) आणि रायबरेली मधील मॉडर्न कोच फॅक्टरी (एमसीएफ) यांना कामे दिली जाणार आहेत. या एकाच वेळीच्या कामामुळे २३८ एसी लोकलपैकी पहिली लोकल २०२७ मध्येच उपलब्ध होणार आहे. संपूर्ण २३८ लोकलचा ताफा २०३० पर्यंत पूर्ण करण्याचा दावा एमआरव्हीसीने केला आहे.

Mumbai local AC train
MMRDA Mumbai One app : ‘मुंबई वन’ ॲपवरून १ कोटी तिकिटांची विक्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news