

मुंबई : तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे गेल्या तीन दिवसात मुंबईला आठवड्याभर पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे.
३० जूनला ९७ हजार ६६६ दशलक्ष लिटर असलेला पाणीसाठा आता १ लाख २९ हजार ३०९ दशलक्ष लिटर इतका झाला असून तब्बल ३१ हजार ६४३ दशलक्ष लिटर इतकी वाढ झाली आहे.
२०२५ मध्ये ३ जुलैपर्यंत तलावातील पाणीसाठा ६ लाख ७८ हजार दशलक्ष लिटर इतका होता. यावेळी तो १ लाख २९ हजार दशलक्ष लिटर इतका आहे. २०२४ च्या तुलनेत मात्र यंदाचा पाणीसाठा दहा हजार दशलक्ष लीटरने जास्त आहे. मुंबई सुरू असलेली पाणी कपाट टाळायची असेल तर, जुलैमध्ये पाणीसाठा ८ ते ९ लाख दशलक्ष लिटरपर्यंत पोहचणे आवश्यक आहे.
तलावांतील पाऊस
अपर वैतरणा - ३८ मिमी
मोडक सागर - ३७ मिमी
तानसा - ५५ मिमी
मध्य वैतरणा - ३६ मिमी
भातसा - ७३ मिमी
विहार - १३७ मिमी
तुळशी - १६४ मिमी