Mumbai Bribery Case: पंधरा लाखांची लाच घेताना आयकर निरीक्षक सीबीआयच्या जाळ्यात

१५ लाख रुपये स्वीकारताना कारवाई; झडतीत ११ लाखांची रोकड आणि कागदपत्रे जप्त
Bribery Case
Bribery CasePudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: बेनामी मालमत्तेशी संबंधित प्रकरण आयकर विभागातून बंद करून देण्यासाठी २० लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी आयकर विभागाच्या तपास शाखेतील निरीक्षकाला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) २७ ऑक्टोबर रोजी अटक केली.

सुभाष कुमार यादव असे अटक केलेल्या निरीक्षकाचे नाव आहे. तडजोडीनंतर १५ लाख रुपये स्वीकारताना सीबीआयने त्याला रंगेहाथ पकडले. त्याच्या निवासस्थानासह संबंधित ठिकाणी केलेल्या झडतीत ११ लाख रुपयांची रोकड आणि आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

Bribery Case
Devendra Fadnavis: शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत परिवर्तनासाठी सर्वेक्षणाची मदत; देवेंद्र फडणवीस यांचा विश्‍वास

यादव हे मुंबईतील स्किंडिया हाऊस येथील आयकर विभागाच्या तपास शाखेत कार्यरत होते. मुंबईतील एका व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून सीबीआयने २७ ऑक्टोबर रोजी या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता.

तक्रारदाराच्या बेनामी मालमत्तेशी संबंधित प्रकरणाची सुनावणी आयकर विभागाच्या बेनामी प्रतिबंधक युनिटकडे प्रलंबित होती.

हे प्रकरण बंद करून देण्यासाठी आरोपी निरीक्षक यादवने तक्रारदाराकडे २० लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. त्यानंतर दोघांमध्ये तडजोड झाली आणि १५ लाख रुपये स्वीकारण्याचे ठरले. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सीबीआयने सापळा रचल्यानंतर त्याला पकडण्यात आले.

Bribery Case
Pradeep Purnekar Case: मीनाक्षी शिंदे यांनी सुपारी दिल्याची आरोपीकडून कबुली; राम पूर्णेकर यांचा दावा

घरझडतीत ११ लाखांची रोकड

आरोपीला पकडल्यानंतर सीबीआयने त्याच्याशी संबंधित ठिकाणी झडती घेतली. या झडतीदरम्यान ११ लाख रुपयांची रोकड आणि प्रकरणाशी संबंधित संशयास्पद कागदपत्रे आढळली. या कागदपत्रांचा तपास केला जात असून, त्यातून आणखी काही माहिती समोर येते का, याचा शोध सीबीआय घेत आहे.

३० ऑक्टोबरपर्यंत कोठडी

अटक करण्यात आलेल्या यादव यांना २८ ऑक्टोबर रोजी मुंबईतील सक्षम न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ३० ऑक्टोबरपर्यंत, म्हणजे दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. लाचेच्या मागणीमागील कारणे, प्रकरण बंद करण्याच्या आश्वासनातील भूमिका आणि या प्रकरणात अन्य कोणी सहभागी आहे का, याचा तपास सीबीआयकडून केला जाण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news