Mumbai Heatwave: मुंबईचा पारा पस्तिशीत; झळा चाळिशीच्या घरात

उन्हाच्या झळा मात्र पारा चाळिशीत असल्यासारख्या बसत होत्या.
Heatwave Alert
Heatwave AlertPudhari
Published on
Updated on

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गुरुवारीही कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्यामुळे दुपारी घराबाहेर पडणेही मुश्कील झाले होते. उन्हाच्या झळा मात्र पारा चाळिशीत असल्यासारख्या बसत होत्या.

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मंगळवारपासून दिलेला उष्णतेचा यलो अलर्ट शुक्रवारपर्यंत कायम राहण्याचा अंदाज दिला आहे. सांताक्रूझ वेधशाळेमध्ये गुरुवारीही कमाल 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर आठवड्याअखेर (34 अंश सेल्सिअस) कमाल तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.

Heatwave Alert
konkan water scarcity: कोकणात पाणीटंचाईच्या झळा तीव्र, धरणांमध्ये 48 टक्के जलसाठा; मेमध्ये संकट आणखी भीषण होणार?

मुंबईची हवा पालटली, सरासरी एक्यूआय 62वर

मुंबईची हवा पालटली असून सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 62 वर आला आहे. पाच दिवसांनंतर प्रथमच एक्यूआय हा शंभरच्या खाली आला.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला प्रदूषणात घट दिसून आली. मात्र, दुसऱ्या आठवड्याअखेर हवा पुन्हा खराब झाली. 10 ते 15 एप्रिल असे पाच दिवस वाढत्या प्रदूषणाचे होते. गुरुवारी एक्यूआयमध्ये 40 अंकांनी घट झाली.

Heatwave Alert
Maharashtra labour rule: माथाडींच्या पाठीवरचे ओझे झाले हलके! पन्नास किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्यांवर बंदी

पारसी कॉलनी, प्रभादेवी (एक्यूआय 44), मालाडमध्ये (46) सर्वात कमी प्रदूषणाची नोंद झाली.मुंबईची हवा पालटली असून सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 62 वर आला आहे. पाच दिवसांनंतर प्रथमच एक्यूआय हा शंभरच्या खाली आला.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला प्रदूषणात घट दिसून आली. मात्र, दुसऱ्या आठवड्याअखेर हवा पुन्हा खराब झाली. 10 ते 15 एप्रिल असे पाच दिवस वाढत्या प्रदूषणाचे होते. गुरुवारी एक्यूआयमध्ये 40 अंकांनी घट झाली. पारसी कॉलनी, प्रभादेवी (एक्यूआय 44), मालाडमध्ये (46) सर्वात कमी प्रदूषणाची नोंद झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news