

मुंबई : सूर्याचा प्रकोप कायम असून दोन दिवसांनंतर पुन्हा उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शुक्रवार आणि शनिवारी (13 आणि 14 मार्च) पारा 38 अंशांवर जाणार असल्याचे भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) साप्ताहिक फोरकास्टमध्ये सांगण्यात आले आहे.
सांताक्रूझ वेधशाळेमध्ये सोमवार, मंगळवार आणि बुधवारी कमाल तापमान अनुक्रमे 38.9, 39 आणि 37 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. 10 मार्चला नोंदवले गेलेले 39 अंश सेल्सिअस हे यंदाचे सर्वाधिक तापमान ठरले. मात्र 11 मार्चला 36 आणि 12 मार्चला 33 अंश सेल्सिअसवर पारा उतरला. आता शुक्रवारी पुन्हा पारा 38 अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे.
आठवड्याचे सुरुवातीचे तीन दिवस पारा चाळिशीच्या घरात गेला तरी प्रत्यक्षात जाणवणारे तापमान चाळिशीहून अधिक होते.
सर्वांत उष्ण आठवडा
8 मार्च - 37 अंश सेल्सिअस
9 मार्च - 38.9
10 मार्च - 39
11 मार्च - 36
13 मार्च - 38 (अपेक्षित)
14 मार्च - 37 (अपेक्षित)