MPCB administrative dispute : देवेंद्र सिंह पुन्हा अडचणीत

प्रदूषण नियंत्रण मंडळावरील पुनर्नियुक्तीस पर्यावरण विभागाचा विरोध
Devendra Singh reinstatement
देवेंद्र सिंह पुन्हा अडचणीत pudhari photo
Published on
Updated on

मुंबई ः नरेश कदम

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या ब्रिफिंगला न गेल्याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंद्र सिंह यांचे झालेले निलंबन रद्द झाल्यावरही ते अद्याप पुनर्नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. देवेंद्र सिंह यांच्या प्रदूषण नियंत्रण मंडळावरच्या पुनर्नियुक्तीस पर्यावरण विभागाचा विरोध असल्याचे कळते.

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणाबाबतच्या एका प्रश्नाच्या ब्रिफिंगसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंद्र सिंह हे उपस्थित राहिले नाहीत, असा ठपका ठेवत विधानसभेचे तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

Devendra Singh reinstatement
Bomb threat Vidhan Bhavan : विधान भवनात बॉम्ब ठेवल्याची अफवा

आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याला एका क्षणात निलंबित करण्याची ही राज्य विधानसभेतील पहिली घटना असली तरी महायुती सरकारमधील सत्तासंघर्षातला देवेंद्र सिंह बळी ठरले असल्याचे सनदी अधिकाऱ्यांचे मत आहे. देवेंद्र सिंह यांच्या दिलगिरीनंतर त्यांचे निलंबन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रद्द केले. पण आता त्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारण्यास पर्यावरण विभागाचा विरोध आहे.

देवेंद्र सिंह यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव म्हणून पुनर्नियुक्ती होणार की नाही हे स्पष्ट नाही. मात्र मंडळाच्या सदस्य सचिव या क्रीम पोस्टसाठी सनदी अधिकाऱ्यांमध्ये जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे.

Devendra Singh reinstatement
Industrial gas shortage : औद्योगिक गॅसपुरवठ्यात देशभर 20% कपात!

राजकीय किनार

देवेंद्र सिंह 2011 च्या बॅचचे आयएएस आहेत. गेली तीन वर्षे ते रत्नागिरीचे जिल्हाधिकारी होते. तत्कालीन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्यात टोकाचे मतभेद झाले आणि ढाकणे हे बाजूला झाले. त्यानतंर एम. देवेंद्र सिंह यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती झाली. पण पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि सिद्धेश कदम यांच्या भांडणात देवेंद्र सिंह यांचा बळी गेल्याचे बोलले जाते. देवेंद्र सिंह यांच्या पुनर्नियुक्तीस मुख्यमंत्री कार्यालय राजी असले तरी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि या विभागाच्या सचिवांचा विरोध असल्याचे कळते, तर शिंदे गटाचे देवेंद्र सिंह या पदावर कायम ठेवा, असा आग्रह धरला आहे. त्यामुळे याला आता राजकीय किनार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news