Mumbai crime : आयआयटीमध्ये आढळली जिवंत काडतुसे!

संपूर्ण साखळी शोधून संबंधितांवर गुन्हा दाखल : गृह राज्यमंत्री योगेश कदम
IIT Bombay student live cartridges case
आयआयटीमध्ये आढळली जिवंत काडतुसे!pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्याकडे फेब्रुवारी महिन्यात पाच जिवंत काडतुसे आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आयआयटीतील एका विद्यार्थ्याच्या बिहारहून आलेल्या मित्राच्या बॅगेत ही काडतुसे आढळली. त्यामुळे पोलिसांनी सखोल तपास करून संबंधित व्यक्तींना अटक केली असून या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचण्याचे काम करण्यात आले आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधान परिषदेत दिली.

काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी विधान परिषदेत नियम 93 अन्वये या मुद्दयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. या प्रकरणात विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या भांडणानंतर सुरक्षा रक्षकांनी अधिक तपासणी केली असता दारूच्या बाटल्याही आढळल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचे धागेदोरे बिहारमधील समस्तीपूरमध्ये पोहोचले असल्याचेही यावेळी भाई जगताप यांनी स्पष्ट केले.

IIT Bombay student live cartridges case
Jaykumar Gore : भूमिहीन लाभार्थ्यांना घरासाठी जागा देण्यात महाराष्ट्र देशात अव्वल

या प्रकाराच्या मुळापर्यंत जाऊन साखळी शोधा अशी मागणीही त्यांनी केली. आयआयटी मुंबई ही केंद्र शासनाच्या अखत्यारीतील संस्था असल्याने तेथे तपासासाठी पोलिसांना पूर्वपरवानगीने जावे लागते. याप्रकरणात एका विद्यार्थ्याच्या मित्राच्या बॅगेमध्ये जिवंत काडतुसे आढळून आली होती. सदर विद्यार्थी व त्याचा मित्र हे दोघेही बिहार येथील असून, आयआयटी पवईच्या वसतिगृहात पाहुण्यांना राहण्याची परवानगी असल्यामुळे तो मित्र तेथे आला होता. त्याच्या बॅगेमध्ये आढळलेली काडतुसे बिहारमधून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, असे राज्यमंत्री कदम यांनी सांगितले.

IIT Bombay student live cartridges case
Bomb threat Vidhan Bhavan : विधान भवनात बॉम्ब ठेवल्याची अफवा

या प्रकरणी काडतुसे पुरवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यालाही अटक करण्यात आली आहे. तसेच ज्याच्याकडून ती विकत घेतली होती त्या व्यक्तीवरही कारवाई करण्यात आली असून संपूर्ण साखळी शोधून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही कदम यांनी सांगितले. या घटनेमागील उद्देश काय होता याबाबत अधिक तपास सुरू असून चौकशीच्या अनुषंगाने आवश्यक ती माहिती सभागृहाला अवगत करून दिली जाईल, असेही राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news