Mumbai Megablock: हार्बर मार्गावर रविवारी साडेसहा तासांचा ब्लॉक; पश्चिम रेल्वेवर जंबो ब्लॉक

यावेळी ठाणे-वाशी, नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर लोकल उपलब्ध असतील. दरम्यान पश्चिम रेल्वेचा सांताक्रूझ-गोरेगाव स्थानकांदरम्यान जंबो ब्लॉक राहणार आहे.
Mumbai Railway Megablock
Mumbai Railway MegablockPudhari
Published on
Updated on

मुंबई: रेल्वे मार्गाच्या दुरुस्ती व देखभालीसाठी मध्य रेल्वेच्या हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावर रविवार 19 एप्रिलला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सुमारे साडेसात तास पनवेल-सीएसएमटी व पनवेल-ठाणे मार्गावरील लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील. यावेळी ठाणे-वाशी, नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर लोकल उपलब्ध असतील. दरम्यान पश्चिम रेल्वेचा सांताक्रूझ-गोरेगाव स्थानकांदरम्यान जंबो ब्लॉक राहणार आहे.

हार्बर मार्ग

पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या अप मार्गावरील लोकल आणि सीएसएमटी येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत पनवेल, बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या लोकल रद्द .

Mumbai Railway Megablock
Nashik IT Conversion Case: नाशिक येथील आयटी कंपनीतील प्रकार एका मॉड्युलनुसार: मुख्यमंत्री

ट्रान्स हार्बर

पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या अप मार्गावरील लोकल आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाउन मार्गावरील लोकल रद्द.

Mumbai Railway Megablock
Taloja Jail Attack: तळोजा कारागृहात माहीमच्या कैद्यावर हल्ला; कैदी गंभीर जखमी

पश्चिम रेल्वे

कुठे : सांताक्रूझ आणि गोरेगाव.

कधी : सकाळी 10 ते दुपारी 3.

परिणाम : जलद मार्गावरील सर्व लोकल सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान धिम्या गतीच्या मार्गावर धावणार.काही लोकल रद्द तर काही बोरिवली आणि अंधेरी सेवा हार्बर मार्गावरून गोरेगावपर्यंत चालवल्या जातील. बाधित होणाऱ्या लोकलची सविस्तर माहिती उपनगरीय विभागातील सर्व स्थानकांवरील स्टेशन मास्तरांकडे उपलब्ध.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news