Taloja Jail Attack: तळोजा कारागृहात माहीमच्या कैद्यावर हल्ला; कैदी गंभीर जखमी

अल्तमश शेख याच्या बरॅकमध्ये असलेल्या मुबीन कादर शेख या कैद्याने अल्तमशवर पैशांसाठी दबाव टाकल्याचे सांगितले जात आहे.
Taloja Jail Attack
Taloja Jail AttackPudhari
Published on
Updated on

पनवेल: तळोजा मध्यवर्ती कारागृहात पैशाच्या वादातून झालेल्या हल्ल्यात माहीम येथील न्यायबंदी अल्तमश युसुफ शेख (वय 38) गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कारागृहाच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तळोजा मध्यवर्ती कारागृहातील सर्कल क्रमांक 3 मधील बॅरेक क्रमांक 8 मध्ये बुधवारी (15 एप्रिल) सकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला. अल्तमश शेख याच्या बरॅकमध्ये असलेल्या मुबीन कादर शेख या कैद्याने अल्तमशवर पैशांसाठी दबाव टाकल्याचे सांगितले जात आहे.

Taloja Jail Attack
Rain Alert: राज्यभरात आजपासून पावसाचा अंदाज

अल्तमशने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी मुबीन शेखने त्याला 10 हजार रुपये मिळवून देण्यासाठी बहिणीच्या नावाने चिठ्ठी लिहून देण्यास भाग पाडले. बाहेर गेल्यानंतर ही रक्कम ‌‘गुगल पे‌’च्या माध्यमातून पाठवण्याची व्यवस्था करण्यास सांगितले.

मात्र, अल्तमशने तसे करण्यास नकार देताच झगडा उभा राहिला. तो विकोपाला गेला. आरोपी मुबीन शेखने अल्तमशवर जोरदार हल्ला केला. पोटात आणि कानाखाली ठोसे मारत मारहाण केली.

Taloja Jail Attack
Success Story: कुर्ल्याच्या झोपडपट्टीतून न्यायाधीशपदापर्यंत! मुंबई महापालिका कर्मचाऱ्याच्या मुलाचे प्रेरणादायी यश

अल्तमशचा उजव्या बाजूचा खालचा दात तुटला व त्याच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. हे सारे होत असताना कारागृहाची सुरक्षा काय करत होती, हा प्रश्नच आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सरला दसगुडे करत असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news