Mumbai Cesarean Delivery Rate: मुंबईत ६०% प्रसूती सिझेरियनने? आकडे पाहून धक्का, पण तज्ज्ञांनी सांगितले वेगळे कारण!

गंभीर व गुंतागुंतीच्या गर्भवती मोठ्या रुग्णालयांत पाठवल्याने प्रमाण अधिक; अनावश्यक सिझेरियनचा थेट निष्कर्ष चुकीचा
Pregnancy
PregnancyPudhari
Published on
Updated on

मुंबई: मुंबईतील मोठ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये सिझेरियन प्रसूतीचे प्रमाण ५० ते ६० टक्क्यांपर्यंत असल्याचे दिसून येत आहे.

मुंबईतील लहान रुग्णालये, प्रसूतिगृहे तसेच खासगी रुग्णालयांतून गंभीर आणि गुंतागुंतीच्या गर्भवतींना पुढील उपचारांसाठी केईएम, नायर, सायन, कूपर यांसारख्या मोठ्या रुग्णालयांकडे पाठविले जाते. त्यामुळे या रुग्णालयांमध्ये सिझेरियनचे प्रमाण स्वाभाविकपणे अधिक दिसत असल्याचे स्त्रीरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मोठ्या रुग्णालयांत दाखल होणाऱ्या गर्भवतींपैकी सुमारे ४० ते ५० टक्के महिलांचे यापूर्वी एक किंवा दोन सिझेरियन झालेले असतात.

त्याशिवाय गर्भावस्थेतील उच्च रक्तदाब, झटके येण्याची स्थिती, गर्भाची वाढ खुंटणे, गर्भजल कमी होणे, गर्भाशयाच्या खाली नाळ येणे, आयव्हीएफमधून झालेली गर्भधारणा, जुळी गर्भधारणा तसेच अधिक वयातील गर्भधारणा अशा गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्येही सिझेरियनची गरज भासू शकते.

Pregnancy
Mogra Pada Farmers: मेट्रोसाठी जमीन दिली, आता शेतकऱ्यांना मिळणार विकसित भूखंड; १९८ जणांना मोठा दिलासा!

त्यामुळे ५० ते ६० टक्के सिझेरियन म्हणजे तेवढ्याच प्रमाणात अनावश्यक सिझेरियन, असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. संबंधित रुग्णालयांमध्ये किती गर्भवती उच्च जोखमीच्या होत्या, किती महिलांचे यापूर्वी सिझेरियन झाले होते आणि किती महिलांना प्रसूतीच्या अंतिम टप्प्यात अन्य रुग्णालयांतून संदर्भित करण्यात आले, याची स्वतंत्र आकडेवारी तपासणे आवश्यक आहे.

आई-बाळासाठीही सिझेरियनचे धोके

सिझेरियन ही वैद्यकीय गरजेनुसार केली जाणारी शस्त्रक्रिया असली तरी त्यात काही धोके असतात. रक्तस्राव, संसर्ग आणि भूल देताना होणाऱ्या गुंतागुंतीचा धोका असतो. पोटात चिकटे तयार झाल्याने पुढील शस्त्रक्रिया अधिक अवघड होऊ शकते.

Pregnancy
Ravi Pujari Extortion Case: रवी पुजारी पुन्हा चर्चेत! २० वर्षांपूर्वीच्या खंडणीपासून १० कोटींच्या आरोपापर्यंत काय आहे संपूर्ण प्रकरण?

पुढील गर्भधारणेत गर्भाशयाच्या जुन्या जखमेच्या ठिकाणी ताण येण्याचा धोका वाढतो. तसेच सामान्य प्रसूतीच्या तुलनेत रुग्णालयात राहण्याचा कालावधी आणि उपचारांचा खर्चही अधिक असतो, असे कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले.

वैद्यकीय गरज नसताना ३७-३८ आठवड्यांत सिझेरियन केल्यास काही बाळांना जन्मानंतर श्वसनाचा त्रास होऊ शकतो. त्यांना नवजात अतिदक्षता विभागात दाखल करण्याची गरज भासू शकते. त्यामुळे सिझेरियनचा निर्णय आई आणि बाळाची वैद्यकीय स्थिती लक्षात घेऊनच घेणे गरजेचे असल्याचे डॉ. पालवे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news