Mogra Pada Farmers: मेट्रोसाठी जमीन दिली, आता शेतकऱ्यांना मिळणार विकसित भूखंड; १९८ जणांना मोठा दिलासा!

मुंबई मेट्रो मार्ग ४, ४ अ आणि १०च्या एकात्मिक कारशेडसाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना मालकी हक्काने भूखंड मिळणार
Metro
MetroPudhari
Published on
Updated on

मुंबई: मुंबई मेट्रो मार्ग ४, ४ अ व १० प्रकल्पाच्या एकात्मिक कारशेड डेपोकरिता जमीन दिलेल्या ठाणे जिल्ह्यातील मौजे मोघरपाडा येथील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मालकी हक्काने विकसित भूखंड देण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.

मोघरपाड्यातील प्रकल्पबाधित १९८ शेतकऱ्यांना २२.५ टक्के व १२.५ टक्के विकसित भूखंडांचे वाटप करण्यात येणार आहे.

Metro
Ravi Pujari Extortion Case: रवी पुजारी पुन्हा चर्चेत! २० वर्षांपूर्वीच्या खंडणीपासून १० कोटींच्या आरोपापर्यंत काय आहे संपूर्ण प्रकरण?

मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व परिवहन व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो रेल प्रकल्पाचा बृहत आराखडा तयार केला. यात वडाळा ते कासारवडवली ठाणे या मेट्रो मार्गिका-४ प्रकल्पास मान्यता देण्यात आली.

या मार्गिका ४ प्रकल्पास निकडीचा सार्वजनिक प्रकल्प व महत्त्वपूर्ण नागरी परिवहन प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे. ही मार्गिका पुढे गायमुखपर्यंत वाढविण्यात आली आहे.

Metro
Maharashtra SIR Voter List: संशयास्पद मतदारांची नावे मतदारसंघ व बूथनिहाय प्रसिद्ध करा; काँग्रेसची मागणी

या मेट्रो मार्गिका ४, ४ अ व १० व ११ यांच्यासाठी मौजे मोघरपाडा येथे एकात्मिक कारशेड डेपो उभारण्यात येत आहे. त्याकरिता येथील सर्व्हे क्र. ३० मधील एकूण २११.७६ हे. आर. जमिनीपैकी १७४.०१ हे. आर. जमीन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला मिळाली आहे.

या जमिनीवरील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना २२.५ टक्के व १२.५ टक्के विकसित भूखंड वाटप योजनेस, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मान्यता दिली होती. त्यानुसार या जमिनीवरील प्रकल्पबाधित १६७ शेतकरी व ३१ अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना असे विकसित भूखंड मालकी हक्काने वाटप करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news