Mumbai Dhol Tasha: डीजे साऊंडला ब्रेक; मुंबईत पुन्हा ढोल-ताशांचा ‘दणदणाट’! गणेशोत्सवामध्ये पारंपरिक वाद्यांची पुन्हा चलती

गणेशमूर्ती आगमन मिरवणुकांसाठी मुंबईतील गणेश मंडळांची ढोल-ताशाला पसंती वाढली आहे. मोठ्या साऊंड सिस्टिमला मात्र अल्प प्रतिसाद मिळत आहे.
Mumbai Dhol Tasha
Mumbai Dhol TashaPudhari
Published on
Updated on

मुंबई: मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव तरुण मंडळांमध्ये यावर्षी उत्साहाचे वातावरण आहे.तरुण मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन मिरवणुकांसाठी ढोल ताशाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र; मोठ्या साऊंड सिस्टिमला अल्प प्रतिसाद दिसत असल्याचे चित्र आहे. गणेश मूर्ती आगमन मिरवणुका सुरू झाल्या आहेत.यामुळे मुंबईत ढोल- ताशाचा आवाज घुमू लागला आहे.

गणेशाेत्सव काळात पूर्वी लेझीम, हलगी, ताशे आदी पारंपरिक वाद्ये गणेशमूर्ती आगमन व सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीवेळी (अनंत चतुर्दशी) मंडळे आणत होती. हे मिरवणुकीचे वैशिष्ट्य असायचे. पण; कालांतराने गणेशोत्सवाचे स्वरूप बदलले.

१५ ते २० वर्षापासून या पारंपरिक वाद्यांची जागा माेठ्या आवाजाच्या साऊंड सिस्टिमने (स्टेरिओ) घेतली.कर्णकर्कश आवाजाने मिरवणुकीत सहभागी झालेल्यांच्या कानठळ्या बसायच्या. याची दखल घेत राज्य सरकारने ध्वनी मर्यादा ठरविली.

Mumbai Dhol Tasha
Mumbai Groundwater Level: उपसा थांबवा, अन्यथा समुद्राचे पाणी शहराच्या भूजलात जाईल; केंद्रीय भूजल मंडळाचा पालिकेला अहवाल सादर

ध्वनी प्रदूषण केले तर संबधित मंडळ व साऊंड सिस्टिम मालक-चालक यांच्यावर पाेलिस दफ्तरी गुन्हे दाखल झाले. यामुळे अनेक गणेश मंडळांनी साऊंड सिस्टिम न आणता ढाेल-ताशा या वाद्याला पसंती दिली. यातून पुन्हा ढोल ताशांची क्रेझ मिरवणुकीत आली आहे.

साऊंड सिस्टिमला घरघर

मोठ्या साऊंड सिस्टिमला अल्प प्रतिसाद मिळत आहे. सार्वजनिक गणेश मंडळाला गणेशमूर्ती आगमन मिरवणूकसाठी पोलिस प्रशासन यांची साऊंड सिस्टिमला परवानगी मिळत नसल्याने बहुतांश मंडळे जागेवरच साऊंड सिस्टिम लावत असल्याचे चालक मालक यांच्याकडून सांगण्यात आले.

Mumbai Dhol Tasha
BMC Engineer Transfer: पालिकेतील अभियंत्यांच्या बदल्या ऑनलाइन प्रणालीने! राजकीय शिफारशींना बसणार चाप

याबाबत मुंबईतील साऊंड सिस्टिम मालक-चालक संदीप मसूरकर म्हणाले, गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीसाठी मोठ्या साऊंड सिस्टिमला सार्वजनिक गणेश मंडळाकडून फारशी मागणी नाही. याउलट; मंडळाच्या जागेवरच साऊंड सिस्टिम बहुतांशी मंडळे लावतात.दोन बेस,दोन टॉप साठी ४ ते ५ तासाकरिता सुमारे ३० हजार रुपये भाडे आकारले जाते.

गणेश मंडळांची ढोल-ताशाला पसंती

आज मुंबईमध्ये१५ ढोल व ६ ताशाचे मिळून तासाला सुमारे २० हजार रुपये तर तीन तासाला सरासरी ६० हजार रुपये भाडे घेतले जाते. दर शनिवारी व रविवारी गणेशमूर्ती आगमन मोठ्या प्रमाणात होत असल्याने दिवसाला सकाळ व सायंकाळी असे दोनवेळा ढोल ताशे पथकातील स्वयंसेवक काम करतात.

पुढील आठवड्यात गणेश मूर्तीचे आगमन मोठ्या प्रमाणात होईल. त्यामुळे मुंबईतील ढोल ताशा पथकाचे शंभर टक्के बुकिंग झाले असल्याचे ढोल पथकाकडून सांगण्यात आले.

याबाबत भांडूप (पश्चिम) येथील एका पारंपरिक वाद्य पथकाचे संस्थापक अध्यक्ष जयेश चाळके म्हणाले, एका ढाेल ताशाच्या पथकातील मिळालेल्या कमाईतून १५ टक्के मेंटेनेन्स, १० टक्के भाडे हे ढाेलताशे ठेवण्यासाठी लागणाऱ्या गाेडावूनला तर १० टक्के सामाजिक काम असे ३५ टक्के जाते. उर्वरित; ५५ टक्के हे पथकातील सहकाऱ्यांना दिले जाते. येत्या रविवारी (दि.६) मुलुंड, तर गणेश चतुर्थी दिवशी ढोल ताशाचे बुकिंग आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news