BMC Engineer Transfer: पालिकेतील अभियंत्यांच्या बदल्या ऑनलाइन प्रणालीने! राजकीय शिफारशींना बसणार चाप

मोठ्या प्रमाणात राजकीय पत्रांच्या शिफारशींना चाप बसणार आहे.
Transfer
TransferPudhari
Published on
Updated on

मुंबई: मुंबई महानगरपालिकेतील २२५ अभियंत्यांच्या बदल्या आणि नियुक्त्या राजकीय शिफारशीनुसार झाल्याचे मंगळवारी उघडकीस आल्यानंतर पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.

आता यापुढे महापालिकेतील प्रत्येक अभियंत्याची बदली ही ऑनलाइन बदली प्रणालीद्वारे होणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात राजकीय पत्रांच्या शिफारशींना चाप बसणार आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महापालिकेत, बदली झालेल्या २२५ अभियंत्यांसाठी मंत्री, आमदार आणि उपमहापौर यांच्या पत्रांच्या शिफारशी केल्याचे माहिती अधिकारातून समोर आणले होते.

Transfer
RTO Bribery Case: रिक्षा परमिटसाठी ४५०० रुपयांची लाच; नवी मुंबईत RTO एजंट ACBच्या जाळ्यात

मुंबई महानगरपालिका आता ऑनलाइन बदली प्रणाली सुरू करण्याच्या दिशेने पुढे जात आहे. मुंबई महापालिकेतील बदली प्रक्रियेत पारदर्शकता व उत्तरदायित्व आणण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे.

Transfer
Mumbai Sea Level Rise: समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे मुंबई, कोलकात्याला जलसमाधीचा धोका; कोट्यवधी लोकांचे अस्तित्व संकटात

२२५ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी राजकीय शिफारशींचा उल्लेख झाल्याच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन बदली प्रणालीची आवश्यकता अधिक अधोरेखित झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news