Ganesh festival jewellery business : बाप्पाचा दागिन्यांचा थाट; गणेशोत्सवात मुंबईत होणार ४ हजार कोटींची उलाढाल

सोन्याचा हार, मोदक, पादुका, गणपती मूर्ती, उंदीर, कानातली बाळी आणि जास्वंदाच्या फुलाला मोठी मागणी
Ganesh festival jewellery business
Ganesh festival jewellery businesspudhari photo
Published on
Updated on

नवी मुंबई : राजेंद्र पाटील

लग्नसराई, दिवाळी, पाडव्यापेक्षाही यावर्षीच्या गणेशोत्सवात गणपतीसाठी सोन्याच्या अलंकार खरेदीला मोठी मागणी आहे. गणेशोत्सवाच्या पाच दिवस आधीच मुंबई सराफात १५०० ते २००० कोटींची उलाढाल झाली आहे. गणेश चतुर्थी ते विसर्जनापर्यंत आणखी २ हजार कोटींची उलाढाल होईल आणि हा गणेशोत्सव सराफा बाजाराला एकूण ४ हजार कोटींची उलाढाल देऊन जाईल, असा अंदाज इंडिया बुलियन ॲण्ड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते कुमार जैन यांनी पुढारीशी बोलताना व्‍यक्त केला.

मुंबईची सुवर्ण बाजारपेठ जणू बाप्पासाठीच सजली असल्याचे चित्र आहे. पादुका, गळ्यातील माळ, उंदीर, जास्वंद पान, जास्वंदाची फुले, गणपती मूर्ती, साखळी, कानातील बाळी, बाजूबंद, त्रिशूळ आणि हनुमानाची गदा या अलंकारांना वाढती मागणी असल्याचे कुमार जैन म्हणाले.

Ganesh festival jewellery business
Sindhudurg News : कर थकबाकीदारांच्या 16 मालमत्ता जप्त

नवस फेडणाऱ्या गणेशभक्तांनी आतापर्यंत एक तोळ्यापासून १५ तोळ्यांपर्यंतचे सोन्याचे हार, पादुकापत्रा, १५ ग्रॅमपासून २५ ग्रॅमपर्यंत सोन्याचा मोदक, उंदीर आणि फुलांची खरेदी केली. दररोज २०० ते २२५ कोटींची अलंकारांची विक्री मुंबई सराफ बाजारात सुरू आहे. ​सोन्याचे मोठे हार हे किमान १५० हून अधिक आहेत. यामुळे सराफ बाजाराला गणेशोत्सवात झळाळी आल्याचे जैन यांनी सांगितले.

केवळ बाप्पाच्या दागिन्यांच्या जोरावर मुंबई सराफात २०० टनांहून अधिक सोन्याची विक्री गणेशोत्सवात होईल. २०२४ मध्ये गणेशोत्सवात सोन्याचे दर ८५ हजार रुपये होता. त्यावेळी ८० टन सोन्याची विक्री झाली होती. २०२५ मध्ये गणेशोत्सवात हाच दर जीएसटीसह १ लाख १० रुपये तोळे एवढा होता, तर यंदा हाच दर १ लाख ५० हजार रुपये तोळे आहे. तरीही मागणी वाढली असल्याचे कुमार जैन यांनी स्पष्ट केले.

Ganesh festival jewellery business
Pimpri Chinchwad Ganesh Mandal: शहरातील केवळ १११ गणेशोत्सव मंडळांना परवाना
  • ८० ते ९० किलोपर्यंत सोन्याच्या पत्र्याचा वापर करून पादुका बाप्पासाठी तयार करण्यात आल्या आहेत.

  • मोदक, उंदीर कमी वजनाचे असल्याने त्यांची संख्याही मोठी आहे. एका दुकानातून साधारणतः १५० उंदीर तर तितक्याच मोदकांची विक्री झाली.

  • झव्हेरी बाजारात एका दुकानातून किमान १५ ते २५ हारांची, पादुकांची विक्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news