Sindhudurg News : कर थकबाकीदारांच्या 16 मालमत्ता जप्त

सावंतवाडी नगरपरिषदेची धडक कारवाई; 31 मार्चपूर्वी थकीत कर भरण्याचे आवाहन
Sindhudurg News
कर थकबाकीदारांच्या 16 मालमत्ता जप्त
Published on
Updated on

मळगाव : सावंतवाड़ी शहरात एकूण 11 हजार 957 नोंदणीकृत मालमता आहेत. यातील कर थकबाकीदारांच्या 16 मालमत्ता नगरपालिकेने जप्त केल्या आहेत. उर्वरीत कर धारकांनी 31 मार्चपर्यंत कर भरणा करावा, असे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे. अन्यथा जप्तीची कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

सावंतवाडी नगरपरिषदेच्या कर विभागाकडून मालमत्ता थकबाकीदारांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर व प्रशासकिय अधिकारी तथा कार्यालयीन अधिक्षक वैभवकुमार अंधारे, कर व प्रशासकिय अधिकारी गोविंद गवंडे, कर निरीक्षक प्राची पाटील, लेखापाल प्रसाद बटवाल, स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, नगररचनाकार गौरव बुगड यांच्या जप्ती पथकाद्वारे शहरातील 16 मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. नगरपरिषदेकडून वारंवार आवाहन करूनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमता सील करणे व जप्तीची कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news