Dangerous Bridges: धोकादायक पुलांबाबत महापालिका सतर्क; विसर्जन मिरवणुकांवर विशेष लक्ष ठेवणार

एकावेळी एकच गणेश मूर्तीला प्रवेश; पूलावर नाचण्यास बंदी
BMC
BMC pudhari photo
Published on
Updated on

मुंबई: रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या १० पुलावरून गणेश विसर्जन मिरवणूक काढणे धोकादायक असल्याचे जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका सतर्क झाली असून अनंत चतुर्दशी दिवशी या धोकादायक पुलावरून जाणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीवर विशेष लक्ष ठेवणार आहे. यासाठी विशेष पथक नेमण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेने मध्य रेल्वे मार्गावरील ४ व पश्चिम रेल्वे मार्गावरील ६ धोकादायक पूलांची यादी निश्चित करण्यात आली आहे.

BMC
Mithi River Scam: दोन निविदांत अपात्र, तरी BMCकडून १४ कोटींचे कंत्राट! मिठी नदी प्रकरणातील कंपनी पुन्हा चर्चेत

याबाबत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अवघत करण्यात आले आहे. यात करी रोड, चिंचपोकळी व भायखळा परिसरातील मंडलिक पुलावर एका वेळेस १६ टन पेक्षा अधिक वजन होणार नाही याची काळजी घ्यावी, असे पालिकेच्या प्रमुख अभियंता (पूल) विभागाने मंडळांना कळवले आहे. त्याशिवाय अन्य सात जुन्या व धोकादायक पूलांची माहितीही लालबाग, परळ, काळाचौकी, गिरगाव व अन्य भागातील गणेश उत्सव मंडळांना अवघत करण्यात आले आहे.

या धोकादायक पूलांवरून विसर्जन मिरवणूक नेताना भाविकांना रोखणे मंडळांना शक्य नाही. त्यामुळे धोकादायक पूलांवर मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती व भाविकांनी गर्दी केल्यास जीवघेणी दुर्घटना होऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

BMC
Maharashtra Water Shortage: १० पावसाने पाठ फिरवली, गावागावांत टँकर! २८६ गावे अन् १,१८२ वाड्यांवर पाणीटंचाईचे संकट

विसर्जन मिरवणुकीसाठी अन्य मार्ग नसल्यामुळे हे पूल कायमस्वरूपी बंद करणे शक्य नाही. त्यामुळे धोकादायक पूलांबाबत मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. या पूलांवर एका वेळी एकच गणेश मूर्ती जाईल याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात येणार आहे. यासाठी केवळ महापालिका कर्मचारी पुलाजवळ तैनात करण्यात येणार नसून पोलिसांवरही जबाबदारी टाकण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

धोकादायक पूल मध्य रेल्वे

  • घाटकोपर

  • करी रोड

  • चिंचपोकळी

  • भायखळा

पश्चिम रेल्वे

  • (ग्रँटरोड व चर्नी रोडमधील)

  • सँडहर्स्ट रोड रेल्वे पूल

  • फ्रेंच रेल्वे पूल

  • केनेडी रेल्वे पूल

  • फॉकलॅण्ड रेल्वे पूल (ग्रँट रोड व मुंबई सेंट्रलमधील)

  • महालक्ष्मी स्टेशन रेल्वे पूल

  • दादर टिळक रेल्वे पूल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news