Mumbai Ganesh idols height: पुढील वर्षी गणेशमूर्तीच्या उंचीवर येणार निर्बंध; BMC राज्य सरकारला पाठवणार प्रस्ताव

BMC Latest News: महापालिका पाठवणार राज्य सरकारला प्रस्ताव; उंची घटवण्‍यासाठी तज्ज्ञांचीही नियुक्‍ती
Ganpati Murti Height.jpg
Ganpati Idols Height.jpgPudhari
Published on: 
Updated on: 

Mumbai Ganesh idols height Limit BMC Proposal

मुंबई : राजेश सावंत

मुंबईत उंच मुर्त्यांची लागलेली स्पर्धा, मूर्ती कोसळण्याचा धोका, आगमन व विसर्जनाच्या मार्गात येणारे अडथळे लक्षात घेऊन पुढील वर्षी गणेश मूर्तींच्या उंचीवर निर्बंध घालण्याचा विचार महापालिकेचा आहे. यंदाच्या गणेशोत्सवानंतर मूर्तीची उंची किती असावी हे निश्चित करून, त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला जाणार असल्याचे समजते.

मुंबईत साजरा होणाऱ्या गणेशोत्सवामध्ये उंच गणेश मूर्ती गेल्या काही वर्षापासून स्पर्धा लागलेली दिसून येते. १० ते १५ फुटापर्यंत गणेश मूर्ती असणे, इथपर्यंत ठीक होते. परंतु गेल्या दशकापासून उंच गणेश मुर्त्यांची फॅशन बनली आहे. मुंबई ४५ फुटापर्यंत गणेश मूर्ती यंदा घडवण्यात आल्या आहे. त्यामुळे एवढ्या उंच मूर्तींची वाहतूक करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो.

Ganpati Murti Height.jpg
Mumbai University : विद्यापीठातील कुत्र्यांची अन्नबंदी नको

अनेकदा या मूर्ती रस्त्यावरून जाणाऱ्या केबल वायरसह विद्युत खांबांना अडकल्या जातात. एवढेच नाही तर मूर्ती ट्रॉलीवरून नेताना, मूर्ती अनबॅलन्स होते. मूर्ती ट्रॉलीवर हलत असल्यामुळे ट्रॉलीचे नटबोल्ट कमकुवत होऊन तुटण्याची भीती असते. अखिल भुलेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेश मूर्तीही नटबोल्ड तुटल्यामुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईत मूर्ति कोसळण्याच्या दोन घटना घडल्या. त्यामुळे मुंबई उंच मूर्ती ने-आण करणे जोखमीचे झाले आहे.

मूर्तींच्या उंचीवर निर्बंध आणण्यासंदर्भात ठोस पावले महानगरपालिकेने उचलण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेला मूर्तीच्या उंचीवर निर्बंध आणण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे पुढील वर्षी मूर्तीवर निर्बंध आणण्यासाठी किती उंचीच्या मूर्ती असाव्यात, याचा लवकरच अभ्यास करण्यात येणार आहे. १० ते १५ फुटापर्यंत उंचीची मूर्ती ने-आण करणे मुंबईसारख्या रहदारीच्या रस्त्यावरून सहज शक्य आहे. विशेष म्हणजे अशा मूर्ती अनबॅलन्स होणार नाही, असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे.

उंची कमी करण्यासाठी तज्ञांची नियुक्ती

गणेश मूर्तीची उंची किती असावी, ती कोणत्या आकारात बनवावी, त्याचा सांगाडा कशाप्रकारे असावा, ती वाहून नेणारी ट्रॉली कशी असावी, व अन्य अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार असल्याचे समजते. तज्ज्ञांनी आपला अंतिम अहवाल तयार केल्यानंतर हा अहवाल हरकती सूचनांसाठी जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना आपल्या हरकती अथवा सूचना नोंदवता येणार आहेत.

Ganpati Murti Height.jpg
Maharashtra Kabaddi Association : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनवर प्रशासकाची 'पकड'

बाप्पाचे रूपच बदलले

गणपती बाप्पा हा बाप्पासारखाच असावा, असे सर्वसामान्य भक्तांना वाटते. मात्र अलीकडच्या काळामध्ये मुंबईमध्ये बाप्पाचे रूपच बदलण्यात आले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून बाप्पाला वाटेल तसे रूप दिले जात. कधी एका पायावर उभा राहणारा गणपती तर कधी बाप्पाचे रूपच बदलून टाकणे, आदी प्रकारामध्ये वाढ झाली आहे. पूर्वी याला अटकाव केला जात असे. पण आता कोणीही बोलायला तयार नाही अशी खंत, भक्तांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

यंदाच्या उंच मूर्ती

  • यंदा सर्वात महागडी व उंच मूर्ती ठरली ती साकीनाक्याचा राजाची. या मूर्तीची उंची ४५ ते ४८ फूट उंच असून या मूर्तीने उंचीचे सर्वच रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

  • खेतवाडी अकरावी गल्ली येथील नरसिंहाच्या अवतारातला गणपती तब्बल ४० फूट उंच आहे

  • आठवा, नववा कामाठीपुरा येथील बर्फानी बाबा मंडळाचा गणपती एकूण ३५ फूट उंच आहे

  • थेट लालबाग परळ येथील नरे पार्क म्हणजे विठ्ठल रूपातला परळचा राजा साधारण ३० फूट उंच असल्याचे समजते.

  • खेतवाडी दुसरी क्रॉस लेन, तिसरी क्रॉस लेन, चौथी क्रॉस लेन, खंबाटा लेन सातवी गल्ली, आठवी गल्ली या मंडळाच्या बाप्‍पाची मूर्ती ३० फूट उंच आहे.

  • चंदनवाडीचा गोड गणपतीची उंची साधारण २५ फूट आहे. ताडदेवच्या महाराजाची उंची देखील २५ फूट आहे.

  • धारावीचा एकदंत हा जवळजवळ २५ फूट उंच आहे. लेबर कॅम्पचा राजा देखील २५ फूट उंच आहे.

शास्त्राप्रमाणे मूर्ती कशी असावी

  • शाडू मातीची पर्यावरणपूरक मूर्ती, मूर्तीची उंची कमीत कमी असावी

  • मूर्ती उभी किंवा प्राणी व पक्ष्यांच्या वाहनावर बसलेली नसून पाटावर किंवा सिंहासनावर बसलेली असावी.

  • बाप्पाची सोंड सामान्यतः डाव्या बाजूला वळलेली असावी. डाव्या सोंडेचा गणपती शांत व सुख-समृद्धीदायक मानला जातो

  • मूर्तीला चार हात असावेत. एका हातात पाश, दुसऱ्या हातात अंकुश, तिसऱ्या हातात मोदक, चौथा हात वरदमुद्रेत (आशीर्वाद देणारा) असावा.

मूर्तीच्या निर्बंधाला गणेशोत्सव समितीचाही होकार

गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीवर निर्बंध लादण्यासाठी बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचाही होकार आहे. राज्य सरकारने उंचीबाबत निर्बंध आणण्याचा निर्णय घ्यावा, अशी आपली सुरुवातीपासून मागणी होती, असे समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news