Mumbai University : विद्यापीठातील कुत्र्यांची अन्नबंदी नको

पालिकेच्या विद्यापीठाला सूचना, श्वानप्रेमींना प्रवेश देण्याचे निर्देश
stray dogs feeding
stray dogs feedingpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरातील कुत्र्यांंना अन्न देण्यासाठी येणाऱ्या श्वानप्रेमी, स्वयंसेवी संस्थांच्या प्रवेशावरील बंदी महापालिकेच्या हस्तक्षेपानंतर हटविण्याच्या मार्गावर आहे. विद्यापीठ परिसरातील कुत्र्यांंना अन्न पुरविण्यास प्रतिबंध करू नये, अशा सूचना मुंबई महापालिकेने विद्यापीठाला दिल्या.

कलिना परिसरातील सुमारे ९५ कुत्र्यांना परिसरातील श्वानप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थांकडून दोन वेळा अन्न दिले जात होते. मात्र, २५ ऑगस्टपासून विद्यापीठाच्या सुरक्षारक्षकांकडून या व्यक्तींना परिसरात प्रवेश नाकारण्यात येत होता. त्यामुळे अन्न-पाण्याअभावी कुत्र्यांची प्रकृती खालावू लागल्याचा दावा केला होता.

stray dogs feeding
Maharashtra Kabaddi Association : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनवर प्रशासकाची 'पकड'

या प्रकाराची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सचिव नितीन ननावरे यांनी मुंबई विद्यापीठ तसेच महापालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. श्वानप्रेमींवरील प्रवेशबंदी तातडीने उठवावी, तसेच निर्णय घेणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

प्राण्यांना अन्न पुरविणाऱ्या व्यक्तींना विद्यापीठ परिसरात प्रवेश करण्यास अथवा श्वानांना अन्न देण्यास प्रतिबंध करू नये, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. ॲनिमल बर्थ कंट्रोल नियम, २०२३ आणि प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स ॲक्ट, १९६०च्या तरतुदींचाही महापालिकेने यासाठी आधार घेतला आहे.

stray dogs feeding
Boy drowns : बैल धुण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू

कुत्र्यांसाठी निवारागृहे उभारण्याचा प्रस्ताव

मुंबईतील शैक्षणिक संस्था, रुग्णालये, क्रीडा संकुले, बस डेपो आणि रेल्वे स्थानकांसारख्या सार्वजनिक ठिकाणी आढळणाऱ्या भटक्या कुत्र्यांंसाठी आणिक गाव, मुलुंड आणि मालवणी येथे श्वान निवारागृहे उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. ऐरोली जकात नाका आणि माहूल येथील जागा निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारितील जमिनींचा शोध घेण्यासाठी समितीही गठीत करण्यात आली आहे, असेही म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news