

Navi Mumbai Rains
नवी मुंबई : रात्रीपासून पहाटेपर्यंत 12 तासांत नवी मुंबईत 90.95 म्हणजे सुमारे 100 मिमी पाऊस झाला. 15 ठिकाणी झाडे कोसळली तर 9 ठिकाणी पाणी तुंबले. नेरुळमध्ये 178 मिमी तर सीबीडी-बेलापूरमध्ये 142 मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली.
रात्रभर सीबीडी बेलापूर सेक्टर 11, 4, 5, 6 भागातील पाणी उपसण्याचे काम विविध ठिकाणी मोठ्या क्षमतेचे पाणी उपसा पंप लावून निरंतर सुरू आहे. यामुळे आता जनजीवन पूर्ववत होत आहे.
बेलापूर- 142.02 मिमी
नेरुळ- 178.00 मिमी
वाशी- 65.50 मिमी-
कोपरखैरणे० 65.00 मिमी
ऐरोली- 46.00 मिमी
दिघा- 49.20 मिमी
सरासरी 90.95 मिमी
झाडे कोसळली- 15
शॉर्टसर्किट- 2
पाणी तुंबणे- 9