

COVID-19 Cases
मुंबई : मुंबईत सोमवार, २६ मे रोजी नवीन दोन कोरोना रुग्णांची भर पडल्याने आता मुंबई शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ३७ झाली आहे. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या ६९ पर्यंत पोहोचली आहे. तर राज्यात सक्रिय रुग्ण २७८ पर्यंत गेले आहेत. हे सर्व निदान झालेले रूग्ण असून सौम्य स्वरूपाचे आहेत.
सोमवारी मुंबईसह पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, लातूर, नवी मुंबई, रायगड आणि कोल्हापूर या जिल्ह्यातून कोरोना रुग्ण आढळून आले. यामध्ये ठाणे विभागातून १९ कोरोना रुग्ण आढळले. यात मुंबई ३७, पुणे- ०२, पुणे ग्रामीण ०१, ठाणे-१९, लातूर - ०१, नवी मुंबई ०७, रायगड ०१ आणि कोल्हापूर - ०१ आदींचा समावेश आहे. यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यात सोमवारी फक्त ठाणे जिल्ह्यातल १९ आणि नवी मुंबईतून ७ कोरोना बाधित रूग्ण आढळले. तर इतर जिल्ह्यातून प्रत्येक १ २ अशी नोंद झाली. यामुळे ग्राणीम जिल्ह्यापेक्षा शहरांत कोरोना रुग्ण आढळून येत असल्याचे दिसून येत आहे.
भारतामध्ये पुन्हा एकदा कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढताना दिसत असून देशातील एकूण रुग्णसंख्या आता १०००च्या पुढे गेली आहे. सध्या परिस्थितीवर आरोग्य तज्ज्ञ नियंत्रण ठेवून असून, बाधित रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहेत, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
देशभरात सर्वाधिक रुग्ण केरळ राज्यात आढळून आले असून २४ तासांत ३३५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण नोंदवले गेले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात १५३, दिल्लीत ९९ आणि गुजरातमध्ये ७६ नवे रुग्ण समोर आले आहेत. एकट्या दिल्लीत आता १००हून अधिक सक्रीय रुग्ण आहेत. महाराष्ट्रात रविवारी ४३ नव्या रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील सक्रीय रुग्णसंख्या आता २०९ झाली आहे.