

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात अधिकारी संवर्गातील सुमारे २२८ रिक्त पदे आहेत. परिणामी अग्निशामन दलातील प्रशासकीय कामकाज करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. शहरातील आगी घटनासह आपत्तकालीन दुर्घटनास्थळी सर्वात प्रथम मुंबई अग्निशमन दलातील जवान दाखल होतात.
यामुळे याविभागात प्रशासकीय संवर्गातील पदे रिक्त ठेवल्यामुळे त्यांचा थेट परिणाम हा दलातील जवानांच्या पदोन्नती, वेतन, निवृत्तीनंतरचे मिळणारे लाभ अशाविविध कामांवर होत आहे.
यामुळे ही रिक्त पदे भरण्यासाठी पालिका प्रशासनाने तात्काळ कार्यवाही सुरु करण्याची मागणी महानगरपालिकेचे एससी एसटी ओबीसी एम्प्लॉईज असोसिएशनचे सरचिटणिस डॉ. संजय कांबळे- बापेरकर यांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे व अतिरिक्त आयुक्त डॉ अविनाश ढाकणे यांच्याकडे केली आहे.
शेवटची भरती २०१२ मध्ये
अग्निशमन दलात अधिकाऱ्यांची शेवटची भरती सन २०१२ मध्ये झाली होती. आज या भरतीला १५ वर्ष झाली आहेत. मुंबईत सुमारे २ कोटी लोकसंख्येसाठी दररोज केवळ ४०-४५ अधिकारी उपलब्ध असल्याने अग्निशमन विभागाचा कारभारांच्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. प्रशासनाने अलीकडेच सहाय्यक स्टेशन अधिकारी संवंर्गाची २१२ पदे रद्द केली आहेत.
ही पदे रद्द करण्यामागे वेतनावर होणारा खर्च वाचवणे हे कारण दिले गेले आहे. या बाबींचा गांभीर्याने विचार करुन, अधिकारी संवर्गाची सर्व आवश्यक पदे तातडीने भरण्याची मागणी बीएमसी एससी एसटी ओबीसी एम्प्लॉईज असोसिएशनचे सरचिटणिस डॉ. संजय कांबळे- बापेरकर यांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे व अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे केली आहे.