Mumbai FDA action : कुठे अस्वच्छता, तर कुठे झुरळे-माश्या,उंदीरही

अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन; १२ हॉटेल-आस्थापनांचे परवाने निलंबित
Mumbai FDA action
Mumbai FDA actionpudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतील हॉटेल, बेकरी, उपाहारगृह, केटरिंग आणि अन्नपुरवठा करणाऱ्या आस्थापनांवर धडक कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मुंबईतील १२ आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित केले. तपासणीत अनेक ठिकाणी पाणी साचणे, झुरळे व माशांचा प्रादुर्भाव, अन्न उघडे ठेवणे, अस्वच्छ परिसर, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी न करणे अशा गंभीर त्रुटी आढळल्या आहेत.

खार पश्चिम स्टेशन रोडवरील मे. अन्नदाता आहार केंद्राची २२ सप्टेंबर रोजी तपासणी करण्यात आली. या ठिकाणी अन्न तयार करण्याच्या जागेत पाणी साचले होते. माशा व मुंग्या आढळल्या, तर खिडक्यांना कीटकप्रतिबंधक जाळ्या नव्हत्या. त्याचबरोबर गिरगावातील हंसराजवाडी येथील मे. न्यू इंग्लिश बेकरीत कणिक जमिनीवरच पॅनमध्ये भरली जात होती आणि तयार पदार्थ उघडे ठेवण्यात आले होते. गंजलेले रॅक, कार्बनचा थर असलेली भांडी आणि जीर्ण लाकडी पृष्ठभाग वापरात होते.

Mumbai FDA action
Mumbai APMC onion potato market : मुंबईकरांचे कांदा-बटाट्याचे वांधे होण्याची चिन्हे

आनंदनगर, सायन-कोळीवाडा येथील मे. ब्लिंक कॉमर्स प्रा. लिच्या फेरतपासणीत रॅक, फ्रिज-रूम आणि शीतगृहाच्या फरशीवर घाण आढळली. पाण्याच्या बाटल्या थेट जमिनीवर ठेवण्यात आल्या होत्या. ४० कामगारांपैकी केवळ सात जणांची वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर करण्यात आली.

बोरिवली पश्चिमेतील एल. टी. रोडवरील मे. राधा कृष्ण उपाहारगृहात स्वयंपाकघरात पाणी साचलेले आणि उघडी कचराकुंडी आढळली. सांडपाण्याची व्यवस्था उघडी होती. निचरा व्यवस्थेत ग्रीस ट्रॅप व झुरळ प्रतिबंधक यंत्रणा नव्हती. कीटकांचा प्रादुर्भाव असल्याच्या खुणा आढळल्या. शिजवलेले अन्न योग्य आच्छादनाशिवाय ठेवण्यात आले होते.

कुर्ला गाव, एल.बी.एस. मार्ग येथील मेसर्स सोडेक्सो इंडिया सर्व्हिसेस प्रा. लि. – मार्केट अपग्रेड एज्युकेशन प्रा. लिमिटेडच्या आस्थापनेत अन्न साठवणूक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झुरळांचा प्रादुर्भाव आढळला. वांद्रे-कुर्ला संकुलातील मे. पी. आर. जेना केटरर्स येथे जिवंत माशा आढळल्या. भिंतींचे पापुद्रे निघालेले होते. बटाटे-कांदे स्वच्छतागृहासमोर ठेवण्यात आले होते. सीफूड खाद्यपदार्थ फ्रिजमध्ये अस्वच्छ पद्धतीने साठवले होते. गोठवलेले अन्न योग्य पद्धतीने वितळवले जात नव्हते. कचराकुंड्या उघड्या असल्याचे निदर्शनास आले.

Mumbai FDA action
Maharashtra MLC Election 2026 : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला

शताब्दी रूग्णालयाचे उपहारगृहही रडारवर

गोवंडीतील येथील शताब्दी रुग्णालयातील उपाहारगृह चालविणाऱ्या मे. शेट्टी केटरिंग सर्व्हिसचा परवाना निलंबित करण्यात आला. अन्न तयार करण्याच्या जागेत अन्नाचे तुकडे विखुरलेले होते. छत, भिंती, फरशी आणि हात धुण्याची जागा अस्वच्छ होती. पिण्याच्या पाण्याचे अहवाल आणि कीटक नियंत्रणाच्या नोंदी उपलब्ध नव्हत्या. याशिवाय दादर पश्चिमेतील मे. फेव्हरेट टेकअवे, चेंबूर येथील मे. स्विन्स्टा एंटरप्रायझेस प्रा. लि. आणि दादर पश्चिमेतील मे. कोहिनूर हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अप्लाइड ट्रेनिंग सेंटर यांचेही अन्न परवाने अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या निर्धारित निकषांचे पालन न केल्याने निलंबित करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news