Mumbai APMC onion potato market : मुंबईकरांचे कांदा-बटाट्याचे वांधे होण्याची चिन्हे

एपीएमसीत ५५ गाड्या तशाच उभ्या : ५० किलो वजनाच्या अटीवर माथाडी ठाम; व्‍यापार बंद ठेवण्याचा संघटनेचाही निर्णय
Mumbai APMC onion potato market
मुंबई एपीएमसीतील कांदा बटाटा मार्केटमध्ये ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोण्या उचलणे माथाडी कामगारांनी बंद केल्याने मार्केटमध्ये आलेल्या ८८ गाड्यांपैकी कांदा-बटाट्याच्या ५५ गाड्या तशाच उभ्या होत्या. (छाया : सुमित रेणोसे)
Published on: 
Updated on: 

नवी मुंबई : राजेंद्र पाटील

मुंबई एपीएमसीतील कांदा बटाटा मार्केट मध्ये ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोण्या उचलणे माथाडी कामगारांनी गुरुवारपासून बंद केल्याने मार्केटमध्ये आलेल्या ८८ गाड्यांपैकी कांदा बटाट्याच्या ५५ गाड्यांना माथाडी कामगारांनी हातही लावला नाही. या गाड्या तशाच उभ्या आहेत. त्या रिकाम्या केल्या जात नाहीत तोपर्यंत कांदा बटाटा व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटनेने घेतला आहे. हा नाशवंत माल बाजार समिती सचिवांच्या ताब्यात देण्याचेही कांदा बटाटा व्यापारी असोसिएशनने जाहीर केले. हा संघर्ष चिघळला तर मुंबईकरांचे कांदा बटाट्याचे वांदे होऊ शकतात.

५० किलोंपेक्षा अधिक वजनाची पोती उचलणार नाही, असे नियमावर बोट ठेवून माथाडी संघटनेने जाहीर केल्यानंतर आता माल पाठवू नका असा निरोप व्‍यापाऱ्यांनी बुुधवारी रात्रीच शेतकऱ्यांपर्यंत पोहचवला. यामुळे गुरुवारी मुंबई एपीएमसीत कांदा, बटाटाची ५० टक्के आवक कमी झाली. माथाडी कामगारांनी गाड्याच रिकाम्या केल्या नाहीत तर मुंबईत होणारा कांदा,बटाटा पुरवठा ठप्प होईल. यामुळे व्यापाऱ्यांनाही माल विकणे शक्य होणार नाही. माथाडी संघटनेने भूमिकेत बदल केला नाही, तर शुक्रवारपासून व्यापार बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे असोसिएशनचे अध्यक्ष संजय पिंगळे यांनी सांगितले.

Mumbai APMC onion potato market
Maharashtra MLC Election 2026 : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला

माथाडी कामगारांच्या भूमिकेला घाऊक व्यापाऱ्यांचा विरोध नाही. कांदा बटाटा भरण्यासाठी लागणारे बारदाण हे ४८ ते ५० किलो वजनाचे बनविण्यात यावे. जेणेकरून शेतकरी असो कि स्थानिक बाजारपेठेतील दलाल, व्यापारी कुणीही ५४ ते ६० किलो वजनाची पिशवीत माल भरणार नाहीत. यासाठी उद्योग मंत्र्यांनी संबंधित बारदाण (पिशवी) बनविणा-या कंपन्यांना, उद्योजकांना ५० किलो माल बसेल एवढ्याच क्षमतेचे बारदाण (पिशवी) बनविण्याचे निर्देश दिल्यास हा प्रश्न सुटेल. मात्र याकडे उद्योग विभागाचे लक्ष नाही.तर कामगार मंत्री यांच्याकडे दोन बैठका झाल्या. मात्र झालेल्या निर्णयांची अजून तरी अंमलबजावणी झाली नसल्याचे पिंगळे यांनी सांगितले.

माल नाशवंत, खराब झाला तर नुकसान शेतकऱ्यांचेच

पणनमंत्री जयकुमार रावल यांनी 50 किलोवजनाचा निर्णय घेतला.मात्र तो केवळ मुंबई मार्केट पुरताच घेतला. तोच निर्णय राज्यातील सर्व एपीएमसीला लागू करावा. राज्यात ८०% युनियन नरेंद्र पाटील यांची असताना हा निर्णय फक्त मुंबईतच का असा प्रश्न व्यापारी असोसिएशनने उपस्थित केला. गाडी खाली झाली नाही. हा माल नाशवंत आहे. तो खराब झाला तर नुकसान शेतकऱ्यांचे आहे, याकडेही पिंगळे यांनी लक्ष वेधले.

Mumbai APMC onion potato market
Drishyam 3 Review: ‘दृश्यम 3’ पाहावा की नाही? अजय देवगणच्या चित्रपटातील थरार, अभिनय अन् क्लायमॅक्स कसा आहे?
  • गुरुवारी दुपारपर्यंत केवळ ३८ गाड्या कांदा-बटाटा मुंबईत पाठविण्यात आला. शुक्रवारी मात्र मुंबईत कांदा,बटाट्याची एकही गाडी जाणार नाही.

  • मुंबईला रोज किमान १०० गाडी कांदा आणि ३५ ते ४० गाडी बटाटा लागतो. पंचतारांकित हॉटेल, व्हेज हॉटेल, नाॅव्हेज हाॅटेल, घरगुती खानावळ, वडापाव, पावभाजीसह विक्रेत्यांना होणार मालाची टंचाई मुंबईत थेट कांदा बटाटाच्या सुमारे ७० ते ८० गाड्या जातात.

  • या गाड्या मुंबईत गोरेगाव, बोरीवली, दहिसर, कुर्ला, ठाणे,कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर आदी ठिकाणी थेट पुणे आणि नाशिक जिल्हय़ातून दलालांमार्फत विक्री केला जातो.

  • तो माल दलाल उतरवतात. त्याठिकाणी माथाडी कामगार नसतात. मात्र, एपीएमसीतून हा माल गेलाच नाही तर मुंबईत कांदा, बटाट्याची टंचाई निर्माण होईल आणि भाव भडकतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news