Mumbai Diwali Vehicle Sales: मुंबईत दिवाळीत वाहन खरेदीचा धूमधडाका; कार नोंदणीत १७%, तर दुचाकींमध्ये १२% वाढ

धनत्रयोदशी ते लक्ष्मीपूजनापर्यंत वाहन नोंदणीत वाढ; दुचाकींच्या नोंदणीत १२ टक्क्यांनी वाढ, इलेक्ट्रिक वाहनांनाही पसंती.
Maharashtra Vehicle Sales
Maharashtra Vehicle SalesPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: मुंबईत यंदाच्या दिवाळी उत्सवात नवीन वाहनांच्या खरेदीत मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. धनत्रयोदशीपासून ते रविवारी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तापर्यंत झालेल्या वाहन नोंदणीमध्ये, कार आणि दुचाकींच्या संख्येत गेल्या वर्षाच्या तुलनेत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे.

यामध्ये चारचाकी वाहनांच्या नोंदणीत १७%, तर दुचाकी वाहनांच्या नोंदणीत १२% वाढ झाल्याचे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, यंदा झालेल्या एकूण नोंदणीमध्ये पर्यावरणपूरक (इलेक्ट्रिक) वाहनांचा वाटा मोठा आहे.

Maharashtra Vehicle Sales
NCP Merger: विलीनीकरणाची तारीख अजित पवारांनी मला सांगितली होती; सुनील तटकरे यांचा दावा

परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार, धनत्रयोदशीपूर्वीच्या पंधरवड्यात झालेल्या बुकिंग आणि नोंदणीनुसार मुंबईत ४,२५९ नवीन कारची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षी हा आकडा ३,६५४ इतका होता. म्हणजेच यंदा कार नोंदणीत १७ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, दुचाकींची नोंदणी गेल्या वर्षीच्या ८,६५५ वरून ९,७०७ वर पोहोचली असून, त्यात १२ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

पर्यावरणपूरक वाहनांकडे वाढता कल

यंदा झालेल्या एकूण वाहन नोंदणीमध्ये पर्यावरणपूरक वाहनांचाही मोठा वाटा आहे. यामध्ये ७९७ इलेक्ट्रिक वाहने ( ईव्ही ) आणि १,६८८ सीएनजी ( सीएनजी ) वर चालणाऱ्या वाहनांचा समावेश आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Maharashtra Vehicle Sales
Mumbai Diwali Celebration: मांगल्य अन् चैतन्याने लखलखली दिवाळी; लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोने-चांदी नाण्यांची मोठी खरेदी

वाढत्या वाहनसंख्येमुळे मुंबईच्या रस्त्यांवर ताण

मुंबईकरांमध्ये एकापेक्षा जास्त वाहने खरेदी करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. काही कुटुंबांकडे ३ ते ५ वाहने आहेत; तर मध्यमवर्गीय नागरिक कर्जाच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर कार खरेदी करत आहेत.

या वाढत्या वाहनसंख्येमुळे मुंबईतील एकूण वाहनांचा आकडा ४५ लाखांच्या पार गेला आहे. सध्या मुंबईत प्रति किलोमीटर रस्त्यावर २,२५० वाहने धावत असल्याने रस्ते अधिक दाटीवाटीचे झाले आहेत. गेल्या ५ वर्षांत वाहनांच्या संख्येत ७ लाखांपेक्षा जास्त वाढ झाली असून, त्यापैकी तब्बल २ लाख वाहने केवळ यंदाच्या पहिल्या १० महिन्यांत नोंदवली गेली आहेत.

लक्ष्मीपूजन मुहूर्तासाठी विशेष नोंदणी दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर नवीन वाहन घरी घेऊन जाण्यासाठी मुंबईकरांनी विशेष वाहन नोंदणी केली होती. यामध्ये बोरिवली आरटीओमध्ये ( ४०२ ) वाहने, अंधेरी आरटीओ मध्ये ( ९९ ) वाहने आणि ताडदेव आरटीओमध्ये ( २९९ ) वाहने रविवारी संध्याकाळपर्यंत नोंदणी करण्यात आली होती.

यापैकी दुचाकी आणि चारचाकी अशी आहेत...

  • ताडदेव विभागात २५२ दुचाकी व ४३ चारचाकी

  • अंधेरीत ९७ दुचाकी व २ चारचाकी

  • तर बोरिवलीत ३३६ दुचाकी व ५५ चारचाकी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.