Mumbai Diwali Celebration: मांगल्य अन् चैतन्याने लखलखली दिवाळी; लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोने-चांदी नाण्यांची मोठी खरेदी

दादर फूल बाजारात कोट्यवधींची उलाढाल
पुणेकरांची दिवाळी खरेदी झळकली! पाच हजार कोटींची उलाढाल
पुणेकरांची दिवाळी खरेदी झळकली! पाच हजार कोटींची उलाढालPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: लखलखत्या दीपज्योतींचा प्रकाश, दारापुढे रेखाटलेल्या रंगीबेरंगी रांगोळ्या, तेल-उटण्याचा सुवास, नयनरम्य आरास, नेत्रदीपक रोषणाईचा थाट, घराघरांतून ऐकू येणारा आनंदाचा स्वर आणि फराळाच्या गोडव्यासोबत रंगलेल्या कौटुंबिक गप्पा... अशा मांगल्यपूर्ण, उत्साही आणि चैतन्यमयी वातावरणात रविवारी नरकचतुर्दशीचा दिवाळीचा मुख्य दिवस मुंबईकरांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.

मुंबईतील मुख्य बाजार असलेल्या काळबादेवी, भुलेश्वर आणि लालबाग-दादर परिसरातील दुकाने रात्री उशिरापर्यंत ग्राहकांनी गजबजलेली होती. यंदा महागाईमुळे कपड्यांच्या किमतीत किरकोळ वाढ झाली असली, तरी लक्ष्मीपूजनासाठी नवीन कपडे खरेदी करण्याच्या उत्साहावर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही.

दुसरीकडे, सोन्या-चांदीच्या दरातील चढ-उतारांकडे पाठ फिरवत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चांदीची नाणी आणि सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी झवेरी बाजारात ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तसेच हळद-कुंकू, लाह्या-बत्तासे, कमळगट्टा आणि केरसुणी यांसारखे पूजेचे साहित्य विकणाऱ्या लहान व्यावसायिकांकडेही गर्दी होती.

पुणेकरांची दिवाळी खरेदी झळकली! पाच हजार कोटींची उलाढाल
Private school teacher jobs: शिक्षकभरतीसाठी वयोमर्यादा शिथिल खासगी शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही दिलासा

लक्ष्मीपूजनासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या झेंडू आणि कमळाच्या फुलांना दादरच्या घाऊक बाजारपेठेत प्रचंड मागणी असते. यंदा दादर मार्केटमध्ये फुलांची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे बाजारपेठ ग्राहकांनी ओसंडून वाहत होती.

झेंडू आणि शेवंती: १०० रुपये प्रतिकिलो, गुलछडी: १२० रुपये प्रतिकिलो, लक्ष्मी कमळ: १०० रुपये प्रति नग, विष्णू कमळ: ५० रुपये प्रति नग विकले जात होते. फुलांच्या या गगनाला भिडलेल्या मागणीमुळे स्थानिक किरकोळ आणि घाऊक विक्रेत्यांनी अवघ्या एका दिवसात कोट्यवधींची उलाढाल केल्याचे येथील विक्रेत्यांनी सांगितले.

पुणेकरांची दिवाळी खरेदी झळकली! पाच हजार कोटींची उलाढाल
Bahirinath Festival: दिवाळे कोळीवाड्यात बहिरीनाथ सोहळ्याची अडीचशे वर्षांची परंपरा

शेअर बाजारात 'मुहूर्त ट्रेडिंग'चा उत्साह...

व्यापारीवर्गासाठी लक्ष्मीपूजनाचा दिवस हा नवीन आर्थिक वर्षाचा प्रारंभ मानला जातो. याच मुहूर्तावर 'बॉम्बे स्टॉक एक्सचेंज' आणि 'नॅशनल स्टॉक एक्सचेंज'मध्ये दुपारी खास 'मुहूर्त ट्रेडिंग' पार पडले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.