मुंबई : रविवारी होणाऱ्या धारावी बचाव सभेच्या प्रचाराचे होर्डिंग महापालिका कर्मचाऱ्यांनी पोलीस सोबत घेऊन फाडले आणि उतरवले. कार्यकर्त्यांना पोलिसांकडून धक्काबुक्की-शिवीगाळ, गुन्हे दाखल करून अटकेची धमकी देण्यात आली. तरीही रविवारी ही सभा होईल, असा निर्धार धारावी बचाव आंदोलन समितीने व्यक्त केला.
धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी 4 ठिकाणी झोपडीधारकांच्या पात्रता याद्या म्हणजे परिशिष्ट-2 जाहीर झाले आहेत. मेघवाडी-गणेश नगर, सरदार वल्लभभाई पटेल नगर, टिळक नगर आणि राजीव गांधी नगर या त्या वस्त्या आहेत. या सर्व ठिकाणी साधारणपणे 80 ते 85 टक्के लोक अपात्र करण्यात आलेले आहेत. राजीव गांधी नगरमध्ये तर 121 लोकांच्या पात्रता यादीमध्ये केवळ 2 लोक पात्र झालेले आहेत आणि 119 लोक जे आहेत ते अपात्र आणि अनिर्णित आहेत. गणेश नगर मेघवाडीतील लोकांना डीआरपी कडून 7 दिवसात घरे रिकामी करण्याच्या नोटीसा आल्या आहेत. घरे रिकामी न केल्यास बळाचा वापर करून जमीन धारावी प्रकल्पाच्या ताब्यात दिली जाईल, अशी धमकीही या नोटिशीत देण्यात आली आहे. झोपडीधारकांना धारावीतून हुसकावून लावण्याचा सरकारचा डाव या सर्व घटनांनी उघड केला आहे, असे धारावी बचाव आंदोलन समितीचे निमंत्रक माजी आमदार बाबुराव माने आणि ॲड. राजेंद्र कोरडे यांनी सांगितले.
धारावी बचाव आंदोलनाने या हालचालींच्या विरोधात , कामराज हायस्कूल शेजारी, 90 फूट रोड, धारावी याठिकाणी, रविवारी 7 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.00 वाजता एका जाहीर सभेचे आयोजन केले आहे. या सभेचा प्रचार कार्यकर्ते करत असताना त्यांना पोलीस अडवत आहेत. त्यांच्याकडून पत्रके हिसकावून घेत आहेत, त्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी देत आहेत. या मुस्कटदाबीचा तीव्र निषेध माने आणि कोरडे यांनी केला.