
मुंबईः राज्यात पुन्हा सत्तेत आल्यावर धारावीतील अदानी समूहाचा पुनर्विकास प्रकल्प रद्द करुन त्याठिकाणी धारावीकरांना उद्योगधंद्यासकट घरे दिली जातील, अशी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यातील एका जाहीर सभेत केली.
ग्रामीण भागातील जनतेने मुंबईत यावे. मुंबई तुमची आहे, मराठी माणसाची आहे. मराठी माणसाने रक्त सांडून मुंबई मिळवली आहे. त्यामुळे मुंबईवर तुमचा हक्क आहे. आगामी काळात मविआची सत्ता आल्यास आम्ही धारावी आणि मुंबई परिसरात महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासनही ठाकरे यांनी दिले. धारावीकर अदानीच्या पुनर्वसन प्रकल्पांच्य विरोधात एकजुटीने लढत आहे. अदान समूहातर्फे ज्या पध्दतीने हा प्रकल्प राबविल जातोय त्याला रहिवाशांचा विरोध आहे महायुती सरकारने अदानी समूहाला मुंबईतील सुमारे एक लाख कोटी किमतीची जमीन आंदण दिल्याचा आरोप केला जात आहे.