Viral Video: माणुसकी जिवंत! मुंबईत तरुणी घराचा दरवाजा लॉक करायला विसरली; डिलिव्हरी बॉय घरी आला अन्...

मुंबई जिथे शेजाऱ्याचा शेजाऱ्याला पत्ता नसतो, तिथे एका डिलिव्हरी बॉयच्या प्रामाणिकपणाचे आणि सतर्कतेचे उत्तम उदाहरण समोर आले आहे.
Viral Video
Viral Videofile photo
Published on
Updated on

Viral Video

मुंबई: मुंबई जिथे शेजाऱ्याचा शेजाऱ्याला पत्ता नसतो, तिथे एका डिलिव्हरी बॉयच्या प्रामाणिकपणाचे आणि सतर्कतेचे उत्तम उदाहरण समोर आले आहे. घराचा मुख्य दरवाजा चुकून लॉक करायला विसरून बाहेर गेलेल्या एका तरूणीच्या घराची सुरक्षा एका डिलिव्हरी बॉयने केली. या आगळ्यावेगळ्या मदतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबईत राहणाऱ्या दिव्या उन्नी ही तरूणी घराबाहेर पडताना चुकून मुख्य दरवाजा लावायला विसरली होती. काही वेळाने तिच्या घराच्या पत्त्यावर एक पार्सल घेऊन डिलिव्हरी बॉय पोहोचला. तेव्हा त्याला घराचा दरवाजा सताड उघडा असल्याचे दिसले. घरात कुणीही नसल्याचे लक्षात येताच, त्याने तात्काळ दिव्याला फोन करून याची कल्पना दिली.

'तो' मदतीला धावला

दिव्याने त्याला पार्सल घरात ठेवून जाण्यास सांगितले. मात्र, सुरक्षिततेच्या कारणास्तव तो डिलिव्हरी बॉय पार्सल ठेवून निघून गेला नाही. ती घरी परत येईपर्यंत घराबाहेर थांबण्याचा निर्णय घेतला. दिव्या जेव्हा घरी पोहोचली, तेव्हा तिला दरवाजा उघडा दिसला आणि घराबाहेर तो तरुण पहारा देत होता.

Viral Video
Viral Video: "मी खूप घाबरले होते पण…": पाकिस्तानी तरुणीने मुंबई विमानतळावरील 'तो' १० तासांचा सांगितला अनुभव

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

दिव्याने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तिने या तरुणाची ओळख करून दिली असून त्याचे नाव 'अमजद' असल्याचे सांगितले आहे. दिव्याने अमजदच्या या प्रामाणिकपणाबद्दल आणि सतर्कतेबद्दल त्याचे आभार मानले आहेत.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी अमजदवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. "आजच्या काळात असा प्रामाणिकपणा दुर्मिळ आहे," अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. तर काहींनी अशा जबाबदार कर्मचाऱ्याचा कंपनीने सन्मान करावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे. मोठ्या शहरांमधील धावपळीच्या जीवनात माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

Viral Video
Viral Video: मिलन सुरू असतानाच मादी आपल्या नर जोडीदाराला जिवंत खाते; पाहा निसर्गातील अजब व्हिडिओ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news