Mumbai Delhi Train Cancelled: सीजेपीचा धसका; आज दिल्लीला जाणाऱ्या ५ गाड्या रद्द

१० ऑक्टोबरला दिल्ली आणि हजरत निजामुद्दीनकडे जाणाऱ्या गाड्यांवर परिणाम; दोन गाड्या पाच तास उशिराने सुटणार
Mumbai Delhi Train Cancelled
Mumbai Delhi Train CancelledPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: मुंबई आणि इतर शहरांतून आज दुपारपासून दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकाला जाणाऱ्या पाच गाड्या रेल्वे बोर्डाकडून अचानक रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच दोन गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.

त्यामुळे गेल्या दोन- तीन महिन्यांपूर्वी आरक्षण करून तिकीट काढलेल्या प्रवाशांचे ऐन प्रवासाच्या दिवशी प्रचंड हाल होणार आहेत. रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये दादर, वांद्रे, इंदूर, साबरमती टर्मिनसचा समावेश आहे.

Mumbai Delhi Train Cancelled
Nana Patekar Upcoming Movies: नाना पाटेकरांचे पाच चित्रपट प्रदर्शित होण्याच्या प्रतीक्षेत

रेल्वेच्या या निर्णयामुळे दिल्लीला निघालेले प्रवासी प्रचंड संतापले आहेत. आमच्या नियोजित प्रवासाचे आणि तिकिटाच्या पैशाचे काय ?, असा संतप्त सवाल करत त्यांनी रेल्वेच्या या गलथान कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या दोन्ही प्रमुख रेल्वे स्थानकांच्या परिसरात संभाव्य वाहतूक कोंडी होईल, यासाठी रेल्वे बोर्डाने दिलेल्या सूचनेनंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. तसेच रद्द गाड्यांची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रवाशांना दिल्याचे रेल्वेने सांगितले.

दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीत पुकारलेल्या आंदोलनामुळे रेल्वे स्थानकांच्या परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन, भारतीय रेल्वेने १० ऑक्टोबर रोजी पहाटे ४ ते दुपारी २ या वेळेत नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकांवर पोहोचणाऱ्या मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याची जोरदार चर्चा रेल्वे प्रवासी वर्तुळात आहे.

Mumbai Delhi Train Cancelled
Mumbai Heatwave: ऑक्टोबरमध्येच मुंबई तापली! पारा ३७.६ अंशांवर; मरीन ड्राईव्हवर शुकशुकाट

आज रद्द केलेल्या ५ गाड्या

१) गाडी ( क्र. २०१५५ ) : दुपारी ३.३० वाजतचीडॉ. आंबेडकर नगर (मध्य प्रदेश) नवी दिल्ली सुपरफास्ट एक्सप्रेस

२) गाडी ( क्र. ०९३०९ ) : सायं. ५ वाजताची इंदूर - हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस

३) गाडी क्र. १२४१५ : सायं. ५.१० वाजताची इंदूर - नवी दिल्ली सुपरफास्ट एक्सप्रेस

४) गाडी क्र. १२२४७ : सायं. ५.३० वाजताची वांद्रे टर्मिनस - हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस

५) गाडी क्र. १२९५७ : सायं. ७.२० वाजता साबरमती - नवी दिल्ली सुपरफास्ट एक्सप्रेस

वेळापत्रकात बदल केलेल्या गाड्या

मुंबई सेंट्रलवरून सुटणाऱ्या या दोन गाड्यांच्या वेळापत्रकातही ५ तासांचा बदल करण्यात आला आहे.

१) गाडी क्र. १२९५१ - मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली - सायं. ५ वाजता सुटणारी गाडी पाच तास उशिरा सुटेल.

२) गाडी क्र. १२९५३ - मुंबई सेंट्रल-हजरत निजामुद्दीन - सायं. ५.१० वाजता सुटणारी गाडी पाच तास उशिरा सुटेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news