Diwali break for Dabbawalas : दिवाळीनिमित्त डबेवाल्यांची सेवा तात्पुरती बंद

डबेवाल्यांनी पाच दिवसांची सुटी घेतल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांची गैरसोय होणार
Diwali break for Dabbawalas
दिवाळीनिमित्त डबेवाल्यांची सेवा तात्पुरती बंद pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : दिवाळीनिमित्त मुंबईतील डबेवाले सोमवार (दि.20)पासून 5 दिवसांच्या रजेवर जाणार आहेत. डबेवाले यांची ही सेवा 25 ऑक्टोबर 2025 पर्यंत तात्पुरती बंद राहणार आहे.

बहुतांश डबेवाले पुणे जिल्ह्यातील मावळ भागातील आहेत.अनेकांनी दिवाळी निमित्त गावी जाण्याचा बेत आखला आहे तर अनेकजण मुंबईत राहूनच दिवाळी साजरी करणार आहेत.दरवर्षी गावची यात्रा, पंढरपूरची वारी व अधूनमधून मोजक्या सणाच्या दिवशी ते सुटी घेतात. यंदा दिवाळीनिमित्त डबेवाल्यांनी पाच दिवसांची सुटी घेतल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांची गैरसोय होणार आहे.

Diwali break for Dabbawalas
Samudrayaan Mission : मानवयुक्त समुद्रयानाची पुढील वर्षी चाचणी

जेवण डबे पोहोचवण्याची सेवा 20 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत बंद राहणार आहे.या पाच दिवसांपैकी दोन दिवस सार्वजनिक सुट्टी आहे. दिवसाच्या रजेचा पगार कापून घेऊ नये. 27 ऑक्टोबरपासून डबेवाल्यांची सेवा नियमितपणे सुरू होईल.दिवाळी बोनस म्हणून एक जादा पगार द्यावा व तो ऑक्टोबरच्या पगारात देण्याची मागणी मुंबई डबेवाला असोसिएशन अध्यक्ष उल्हास मुके यांनी केली आहे.

Diwali break for Dabbawalas
Pharmacy admission : औषधनिर्माणशास्त्राच्या सर्वच महाविद्यालयांची प्रवेशबंदी उठवली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news