भारताच्या मानवयुक्त पाणबुडी समुद्रयानचा प्रोटोटाईप 2026 च्या मध्यापर्यंत 500 मीटर खोल डुबकीची चाचणी घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती राष्ट्रीय समुद्र तंत्रज्ञान संस्थेचे संचालक डॉ. बालाजी रामकृष्णन यांनी दिली. भारताच्या बहुसंस्थात्मक खोल समुद्र मोहिमेचा एक भाग असलेले समुद्रयान हा एक असा प्रकल्प आहे. 6,000 मीटर खोलीवर समुद्रात जाऊन शोधकार्य करू शकणारी मानवयुक्त पाणबुडी विकसित करणे हा उद्देश आहे.
2021 पासून प्रयत्न
समुद्रयान मोहिमेसाठी 2021 पासून प्रयत्न सुरू आहेत. ही भारताची एक महत्त्वाकांक्षी खोल-समुद्र शोधमोहीम आहे. जी भारताला अशा सुमारे सहा देशांच्या प्रतिष्ठित यादीत स्थान देईल.
आयआयटी, इस्रोचा सहभाग
भारताच्या राष्ट्रीय समुद्र तंत्रज्ञान संस्थेच्या नेतृत्वाखालील या उपक्रमाने देशातच डिझाईन, चाचणी आणि विकासाच्या विविध पैलूंची पूर्तता करण्यासाठी आयआयटी, इस्रो यांसारख्या भागीदारांना सामील करून घेतले आहे.
मानवरहित चाचण्या
शोध, अभ्यास आणि संशोधनासाठी मानवरहित, खोल समुद्रातील याने चालवली आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला चेन्नईजवळील एका खासगी शिपयार्डमध्ये समुद्रयानच्या प्रोटोटाईपच्या बंदर चाचण्या घेण्यात आल्या.
मत्स्य-6000
मत्स्य-6000 हे वाहन रोबोटिक हात, सेन्सर्स आणि इतर उपकरणे वाहून नेण्यासाठी आणि प्रयोग करण्यासाठी एक व्यासपीठ आहे. खोल समुद्रातील खनिज शोध, भूगर्भीय हालचालींची तपासणी आणि इतर खोल समुद्रातील घटनांचा अभ्यास करणे शक्य होईल.
समुद्रयान प्रशिक्षणासाठी फ्रान्ससोबत काम
यावर्षी ऑगस्टमध्ये, दोन भारतीय जलयात्रींनी फ्रेंच पाणबुडीतून अटलांटिक महासागरात 4,025 मीटर आणि 5,002 मीटर खोलीपर्यंत खोल समुद्रातील मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली.