Mumbai Cyber Fraud: सायबर फसवणुकीसाठी बँक खाती, सिमकार्डचा गैरवापर; सात अटकेत

मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-५ने गोव्यातून सात जणांना अटक केली. विविध व्यक्तींच्या नावावरील बँक खाती आणि सिमकार्डचा ऑनलाइन सायबर फसवणुकीसाठी वापर केल्याचा आरोप असून एटीएम कार्ड, मोबाईल, लॅपटॉपसह कागदपत्रे जप्त करण्यात आली.
Cyber Scam
Cyber ScamFile Photo
Published on
Updated on

मुंबई: विविध व्यक्तींच्या नावावर बँक खाती आणि मोबाईल सिमकार्ड मिळवून त्यांचा वापर ऑनलाइन सायबर फसवणुकीसाठी करणाऱ्या सात जणांना मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-५ने गोव्यातून अटक केली. आरोपींकडून मोठ्या प्रमाणात बँक खात्यांशी संबंधित कागदपत्रे, एटीएम कार्ड, सिमकार्ड, मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.

आर्थिक फसवणुकीची रक्कम हस्तांतरित करण्यासाठी आरोपींनी स्वतःचे ॲप्लिकेशन तयार करून त्याचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी दिली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तेजसकुमार हसमुखलाल दाभघार (३६), पियुषभाई ईश्वरभाई चावडा (१९), जितेंद्रसिंह मोबतसिंह राजपूत (२७), दलपतसिंह बामरसिंह राजपूत (२८), वनराजसिंह जयपालसिंह वाघेला (२१), योगेशकुमार अरविंदभाई पटेल (२६) आणि गौतम तेजाभाई माळी ऊर्फ लुसिफर ऊर्फ गट्टू (२५) यांचा समावेश आहे.

Cyber Scam
Seva Sankalp Abhiyan: वंचित घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा; चंद्रशेखर बावनकुळे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

कक्ष-५च्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीतील आरोपी स्वतःच्या तसेच इतरांच्या नावावर विविध बँकांमध्ये खाती उघडत होते. त्यानंतर या खात्यांशी संबंधित पासबुक, एटीएम कार्ड, चेकबुक, सिमकार्ड तसेच इतर साधने स्वतःच्या ताब्यात ठेवून त्यांचा वापर सायबर फसवणुकीसाठी केला जात असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

९०० एटीएम कार्ड, १६७ सिमकार्ड जप्त

या कारवाईत सुरुवातीला ८८ पासबुक, १४३ चेकबुक, ९०० एटीएम कार्ड, २४ मोबाईल फोन, १६७ सिमकार्ड आणि दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले.

Cyber Scam
PM Modi Birthday: मोदींच्या वाढदिवशी महाराष्ट्रातील लाभार्थी घराघरात लावणार ‘आशीर्वादाचा दिवा’; भाजपची मोहीम

४८ मोबाईल, ९ लॅपटॉप हस्तगत

अटक आरोपींकडून नऊ विविध कंपन्यांचे ४८ मोबाईल फोन, १९ सिमकार्ड, नऊ लॅपटॉप, ५१ एटीएम कार्ड आणि १२ पासबुक असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींपैकी काहींनी आर्थिक फसवणुकीची रक्कम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित करण्यासाठी स्वतःचे ॲप्लिकेशन तयार केले होते. या ॲप्लिकेशनचा वापर कशाप्रकारे झाला, याचा तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news