CSMT Roof Collapse : सीएसएमटी स्थानकात छताचा भाग कोसळला

दोन प्रवासी गंभीर जखमी; आरएलडीएच्या कामावर प्रश्नचिन्ह!
CSMT Roof Collapse
मुंबई : छत कोसळलेला भाग संरक्षित करण्यात आला. (छाया : दीपक साळवी)
Published on: 
Updated on: 

मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक आणि सर्वाधिक वर्दळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पुनर्विकासाचे काम सुरू असताना अचानक छताचा काही भाग गुरुवारी रात्री कोसळला. या घटनेत दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेथे ही घटना घडली तेथे नेहमी वर्दळ असते. त्यामुळे येथे सुरू असलेल्या आरएलडीएच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सर्वाधिक वर्दळ असलेल्या बुकिंग हॉलच्या प्रवेशद्वाराजवळील छताचे पुनर्विकास आणि देखभालीचे काम 'रेल लँड डेव्हलपमेंट अथॉरिटी' (आरएलडीए) द्वारे केले जात आहे. याच छताचा एक भाग गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास कोसळला.

CSMT Roof Collapse
Bombay High Court : गृहनिर्माण संस्था उर्वरित भागावर 'डीम्ड कन्व्हेयन्स' मागू शकते

सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने येथे जास्त वर्दळ नव्हती. मात्र येथून जात असलेले विनायक हटकर (२८) आणि अयान मटवणकर (२४) हे दोन प्रवासी या घटनेत गंभीर जखमी झाले. या दोघांनाही दुखापत झाल्यामुळे उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या कॅज्युअल्टी विभागात दाखल करण्यात आले.

रेल्वेकडून ५ हजारांची मदत

जखमी मटवणकर यांच्या डाव्या पापणीवर गंभीर जखम झाली आहे. शिवाय त्यांच्या उजव्या घोट्याला सूज आहे. तसेच हटकर यांच्या डोक्यावर स्लब कोसळल्याने मोठी जखम झाली. या दोघांना रेल्वेकडून ५ हजार रुपये मदत देण्यात आली आहे. मात्र, आरएलडीएकडून कोणतीही मदत किंवा ठेकेदारावर कारवाई करण्यात आलेली नाही.

CSMT Roof Collapse
Ahilyanagar Jal Jeevan Mission: ‘जलजीवन’ची कामे अपूर्ण; ठेकेदार रडारवर

आरएलडीएच्या विकास कामावर प्रश्नचिन्ह

सीएसएमटी येथे पुनर्विकास आणि देखभालीचे काम सध्या 'रेल लँड डेव्हलपमेंट अथॉरिटी' (आरएलडीए) द्वारे केले जात आहे. यामध्ये ऐतिहासिक इमारतीमधील कार्यालयांचे नूतनीकरण आणि प्लॅटफॉर्म डेकसह स्थानकाच्या परिसराचा विकास अशा कामाचा समावेश आहे. याच महिन्यात ६ ऑक्टोबरला येथील जुन्या इमारतीची भिंत कोसळली होती. शिवाय आरएलडीएकडून फलाट क्र. १४, १५ आणि १६, १७ वर विकास आणि विस्ताराचे काम सुरू आहे. या कामाला देखील बराच वेळ लागलेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news