

Mumbai Crime Update: मुंबईतील आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक भयानक घटना घडली. २५ वर्षाच्या अरबाज सय्यदने आपल्या पत्नीला ॲसिड टाकून मारण्याची धमकी देत तब्बल ४ तास कोंबडा बनवलं होतं. या प्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी अरबाज सय्यदला ताब्यात घेतलं आहे.
२५ वर्षाच्या अरबाजने आधी आपल्या पत्नीला तलवारीने मारण्याचा आणि अॅसिड फेकण्याचा धाक दाखवला होता. त्याने तिला घरात कोंडून ठेवलं होतं. त्यानंतर ४ तास कोंबडा बनून राहण्यास देखील सांगितलं.
पत्नी घरातून आपल्या माहेरी पळून आली असता या अरबाजने माहेरी धिंगाणा घातला. तसेच पत्नीवर चाकूने वार देखील केला. माहेरच्या लोकांनी पोलिसांना संपर्क करून तक्रार केली असता पोलीस तात्कळ घटना स्थळी पोहचले आणि त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलं.
आरोपी अरबाज सय्यद हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून आतापर्यंत त्याच्यावर वेगवेगळे असे तब्बल १९ गुन्हे दाखल आहेत.