

Mumbai Crime News: मुंबईमधील विक्रोळी येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका १३ वर्षाच्या चिमुकलीवर नराधम बेकरी मालकानं तब्बल तीन ते चारवेळा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी विक्रोळी येथील पार्कसाईट पोलीस ठाण्यात याबाबत आरोपी नफिस अहमद अब्दुल रहमान उर्फ सलमानला अटक केली आहे. हा संपूर्ण प्रकार ज्यावेळी मुलीच्या पोटात दुखू लागलं त्यावेळी समोर आला.
आरोपी नफिस अहमद अब्दुल रहमान उर्फ सलमान हा बेकरी चावलतो. पीडित मुलगी अनेकवेळा या नराधमाच्या बेकरीमध्ये खाऊ घेण्यासाठी येत होती. तिला भुरळ पाडून या नराधम सलमानने बेकरीमागे असलेल्या त्याच्या घरात नेऊन तीन ते चारवेळा बलात्कर केला. यानंतर त्याने तिला कोणाला सांगितलंस तर जीवंत ठेवणार नाही अशी धमकी देखील दिली.
काही दिवसांपूर्वी चिमुरडीने सफचंद खाल्ल आणि तिच्या पोटात दुखू लागलं. त्यावेळी पालकांनी तिला डॉक्टरांकडे नेलं असता ती गरोदर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. तिला तत्काळ राजावाडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या तिचावर उपचार सुरू असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.