Powai Crime: 17 वर्षाच्या दिरावर 'खोटी' बलात्काराची केस टाकण्याची धमकी; 32 वर्षाच्या वहिनीने केला अत्याचार, मुंबईतील घटना

Mumbai Crime News: एका ३२ वर्षाच्या वहिनीवर आपल्या १७ वर्षाच्या दिरावर खोटी रेपची केस दाखल करण्याची धमकी
Crime Against Men
Crime Against MenPudhari
Published on
Updated on

Mumbai Crime News: पवईतील एका धक्कादायक घटनेमुळं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. एका ३२ वर्षाच्या वहिनीवर आपल्या १७ वर्षाच्या दिरावर खोटी रेपची केस दाखल करण्याची धमकी देत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी जवळिकता साधल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Crime Against Men
Chhatrapati Sambhajinagar Crime: इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात; १७ वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार, तरूणावर गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, '३२ वर्षीय वहिनी अल्पवयीन दिराच्या मोबाइलवर अश्लील मेसेज करून भेटण्यासाठी दबाव टाकत होती. भेटायला न आल्यास आपले वडील पोलिस असून त्यांना सांगून तुझे वडील आणि आईला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली.

Crime Against Men
Crime News: पत्नीवर CCTV ची पाळत, शेजाऱ्यांशी बोललं तरी मारहाण, छळाला कंटाळून लग्नानंतर अवघ्या ४८ दिवसांतच जीवन संपवले

यानंतर दिराला खोटी रेप केस टाकून अडकवण्याचीही धमकी ३२ वर्षीय वहिनीने दिल्याचा आरोप मुलाने तक्रारीत केला आहे. तसेच घरी कोणी नसताना अल्पवयीन मुलाशी जबरदस्ती जवळीकता साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही मुलाने तक्रारीत केला आहे

Crime Against Men
Crime News: मुख्याध्यापिका पत्नीवर ४ आणि मुलावर ७ गोळ्या झाडल्या; क्षुल्लक वादातून संतापलेल्या बापाने कुटुंबच उद्ध्वस्त केलं

या प्रकरणी पवई पोलिस ठाण्यात मुलाच्या आईच्या तक्रारीवरून ३२ वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पवई पोलिस अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news